आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे या अभिनेत्रींचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दोन्ही दिग्गज अभिनेत्री RRR चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्यावर एकत्र थिरकताना दिसत आहेत. 57 वर्षीय पद्मिनी कोल्हापुरे आणि 64 वर्षीय नीतू यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून चाहते दोघींच्या एनर्जी लेव्हलची प्रशंसा करत आहेत.
फॉर्मल लूकमध्ये दिसल्या पद्मिनी-नीतू
व्हिडिओ शेअर करताना पद्मिनी कोल्हापुरे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले- 'माझ्या आवडत्या नीतू कपूरसोबत नाटू-नाटू गाण्यावर डान्स.' शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पद्मिनी आणि नीतू त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी वेळ घालवताना दिसत आहेत. यावेळी नीतू ब्लॅक अँड व्हाइट फॉर्मल लूकमध्ये दिसत आहेत. तर पद्मिनी यांनी ब्ल्यू टॉप आणि ब्लॅक ट्राउजर परिधान केले आहे.
पद्मिनी नीतू कपूर यांच्या अगदी जवळ आहेत
पद्मिनी कोल्हापुरे यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या ऋषी आणि नीतू यांच्या खूप जवळच्या व्यक्ती आहेत.
व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
पद्मिनी आणि नीतू यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले- 'विश्वास बसत नाही की त्या 64 वर्षांच्या आहेत. एनर्जी आणि लूक बघा.' आणखी एका चाहत्याने म्हटले की, 'दोन लेजंड्स ट्विनिंग करताना, दोघीही माझ्या आवडत्या अभिनेत्री आहेत.' आणखी एका लिहिले, 'तुम्ही दोघीही अप्रतिम आहात, तुमचा उत्साह आवडला.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.