आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगूबाई काठियावाडी:नीतू कपूर यांनी केले चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे कौतुक, म्हणाल्या - बघा आलियाने चौकार-षटकार लगावले

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नीतू यांनी केले आलियाचे तोंडभरुन कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. आलियाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे कौतुक करत सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. आलियाचे कौतुक करत असताना त्यांनी प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले आहे.

नीतू यांनी केले आलियाचे तोंडभरुन कौतुक
नीतू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "बघा आलियाने कसा चेंडू पार्कच्या बाहेर फेकला. चौकार आणि षटकार लगावले आहेत." नीतू यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना आलियाने लिहिले, "लव्ह यू." यासोबतच आलियाने व्हाइट हार्ट इमोजीही बनवले. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वत्र कौतुक होत आहे.

याआधीही नीतू यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले होते. आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर करत त्यांनी लिहिले होते, "उफ्फ्फ आउटस्टँडिंग"

4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणबीर आणि आलिया
रणबीर आणि आलिया 4 वर्षांहून अधिक काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. असे म्हटले जाते की, दोघे गेल्या वर्षी लग्न करणार होते, पण कोरोनामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले. रणबीरने एका मुलाखतीत म्हटले होते की, जर कोरोना व्हायरस नसता तर कदाचित त्याने आलियाशी आधीच लग्न केले असते.

रणबीर आणि आलिया एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले बाँडिंग शेअर करतात. रणबीरची आई नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी आलियाला खूप आवडतात आणि अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टवर ती त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसते. दुसरीकडे रणबीरदेखील अनेकदा आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत चिल करताना दिसतो.

4 फेब्रुवारीला आला होता चित्रपटाचा ट्रेलर
'गंगुबाई काठियावाडी'ची निर्मिती संजय लीला भन्साळी यांनी केली आहे. या चित्रपटात आलियाशिवाय अजय देवगण, विजय राज, शंतनू माहेश्वरी आणि सीमा पाहवा हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर ४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता.

बातम्या आणखी आहेत...