आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावनिक:ऋषी कपूर यांच्या निधनाला एक महिना पूर्ण, पत्नी नीतू भावूक होऊन म्हणाल्या - 'मला धीर द्या कारण तुम्ही मला निरोप दिला आहे'

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऋषी यांचे 30 एप्रिल रोजी मुंबईत रक्ताच्या कर्करोगामुळे निधन झाले होते.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यांचे स्मरण करत त्यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. नीतू यांनी ऋषी यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत ग्रेसी फील्ड्सच्या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. ज्याचा सारां आहे, 'मला धीर द्या कारण तुम्ही मला निरोप दिला आहे.' 

नीतू कपूर यांची इंस्टाग्राम पोस्ट
नीतू कपूर यांची इंस्टाग्राम पोस्ट

नीतू यांच्या या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुलगी रिद्धिमाने हृदयाच्या अनेक इमोजी शेअर केल्या आहेत. सोनी राजदान यांनीही हृदयाच्या इमोजी शेअर करुन 'खूप सुंदर' अशी प्रतिक्रिया दिली. सुझान खानने लिहिले, अतिशय सुंदर कविता आणि त्याहीपेक्षा सुंदर प्रेमकहाणी.

यापूर्वीही शेअर केली होती पोस्टः यापूर्वी ऋषी यांच्या निधनाच्या दोन दिवसांनी नीतू यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. आपल्या कहाणीचा अंत झाला, अशी पोस्ट त्यांनी शेअर केली होती.
 

2 मे रोजी नीतू कपूर यांनी ही इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती.
2 मे रोजी नीतू कपूर यांनी ही इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली होती.

ऋषी आणि नीतू यांचे 22 जानेवारी 1980 रोजी लग्न झाले होते. लग्नापूर्वी या दोघांनी कभी कभी, अमर अकबर अँथनी आणि जहरीला इंसान यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. ऋषी यांचे 30 एप्रिल रोजी मुंबईत रक्ताच्या कर्करोगामुळे निधन झाले होते.

बातम्या आणखी आहेत...