आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतज्ञता:ऋषी कपूर यांची काळजी घेतल्याबद्दल नीतू कपूर यांनी अंबानी कुटुंबाचे मानले आभार,  त्यांचे 'देवदूत' म्हणून केले वर्णन    

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी सकाळी नीतू यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे देवदूत म्हणून वर्णन केले.

अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी नीतू कपूर हळूहळू या दुःखातून स्वतःला सावरत आहेत. या कठिण काळात खंबीरपणे पाठिशी उभे राहणा-यांचे त्या आभार मानत आहेत. त्यांनी अलीकडेच एक पोस्ट लिहून ऋषी यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेस यांच्याविषयी ऋण व्यक्त केले होते. आता नीतू यांनी अंबानी कुटुंबीयांचे कठीण काळात प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. यासाठी त्यांनी मंगळवारी सकाळी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे देवदूत म्हणून वर्णन करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, जेव्हा आम्हाला भीती वाटली तेव्हा तेव्हा प्रत्येकाने आमचा हात धरला आणि दिलासा दिला.

आपल्या पोस्टमध्ये नीतू यांनी लिहिले की, “गेली दोन वर्षे आमच्यासाठी एक कुटुंब म्हणून खूप लांबचा प्रवास होता. ज्यामध्ये चांगल्या दिवसांसोबतच वाईट दिवसही होते.  ते पूर्णपणे भावनांनी परिपूर्ण होते हे सांगण्याची गरज नाही. पण हा एक असा प्रवास आहे, जो आम्ही अंबानी कुटुंबाच्या अफाट प्रेम आणि पाठिंब्याशिवाय पूर्ण केला नसता.'

पुढे त्यांनी लिहिले, 'गेल्या काही दिवसांत आम्ही आमचे विचार एकत्र करुन या काळात असंख्य मार्गाने आम्हाला सुरक्षित ठेवू इच्छिणा-या कुटूंबाबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द शोधण्याचा प्रयत्न केला.'

नीतू पुढे लिहितात, 'गेल्या सात महिन्यांपासून कुटुंबातील प्रत्येक सदस्याने शक्य तितके प्रयत्न करुन प्रिय ऋषीजींची काळजी घेण्यासाठी सर्वकाही केले आहे आणि त्यांची कमीतकमी गैरसोय होईल याचीही काळजी घेतली. त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळाव्या याची काळजी घेतली. त्या व्यतिरिक्त वैयक्तिकरित्या रुग्णालयात येऊन त्यांच्यावर प्रेम दाखवले आणि आमचा हात धरला आणि जेव्हा भीती वाटली तेव्हा आम्हाला दिलासा दिला.'

पुढे त्यांनी लिहिले की, 'मुकेश भाई, नीता भाभी, आकाश, श्लोका, अनंत आणि ईशा, तुम्ही सर्वजण या लांब आणि कठीण प्रवासामध्ये आमच्यासाठी देवदूत होते. आपल्यासाठी आम्हाला जे वाटते ते मोजता येणार नाही. आपल्या निःस्वार्थ समर्थन आणि काळजीबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आमच्या जवळच्या आणि सर्वात प्रिय व्यक्तींमध्ये तुम्ही भेटल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. '

अत्यंत निष्ठा आणि कृतज्ञतेसह,

नीतू, रिद्धिमा, रणबीर आणि संपूर्ण कपूर कुटुंब. ”

30 एप्रिल (गुरुवारी) ऋषी कपूर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या दोन ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सरशी लढा देत होते.

बातम्या आणखी आहेत...