आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावूक पोस्ट:पत्नी नीतूने ऋषी कपूरला दिला अंतिम निरोप, छायाचित्र शेअर करुन लिहिले, 'आपल्या कथेचा अंत झाला आहे'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसरीकडे, मुलगी रिद्धिमाही आपल्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ झाली आहे.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी नीतू यांनी त्यांची आठवण काढत त्यांना अखेरचा निरोप दिला आहे. नीतू यांनी इंस्टाग्रामवर ऋषी यांचे एक छायाचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये त्यांच्या हातात व्हिस्कीचा ग्लास आणि चेह-यावर स्मितहास्य आहे. 'आपल्या कथेचा अंत झाला आहे', असे भावूक कॅप्शन त्यांनी लिहिले आहे.

यापूर्वीही लिहिली होती भावूक पोस्ट : यापूर्वी 30 एप्रिल रोजी नीतू यांनी ऋषींच्या निधनाबद्दल भावनिक पोस्ट शेअर केली होती. नीतू म्हणाल्या होत्या की, "कुटुंबीय, मित्रपरिवार, चित्रपट आणि विविध खाद्यपदार्थ हेच त्यांचे संपूर्ण जीवन होते. जगभरातील चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल ते कृतज्ञ होते. ऋषी यांची इच्छा होती की, लोकांनी त्यांना रडत नव्हे तर हसत कायम स्मरणात ठेवावे.'

मुलगी घेऊ शकली नाही अंत्यदर्शन : दुसरीकडे, मुलगी रिद्धिमाही आपल्या वडिलांच्या आठवणींनी व्याकूळ झाली आहे. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने लिहिले की, 'पापा, मला तुमची खूप आठवण येते, कृपया परत या.' रिद्धिमा दिल्लीत राहत असून ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारात मुंबईत पोहोचू शकली नव्हती. लॉकडाऊनमुळे तिला चार्टर प्लेनने यायची परवानगी मिळाली नव्हती, त्यामुळे ती बाय रोड दिल्लीहून मुंबईकडे निघाली होती.    

बातम्या आणखी आहेत...