आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये कोरोना:अभिनेत्री नीतू कपूर यांना कोरोनाची लागण, खास विमानाने चंदीगडहून मुंबईत आणण्यात आले; चित्रपटाच्या शूटिंग सेटवर झाले संक्रमण

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीतू कपूर यांची तब्येत ठिक आहे.

अभिनेत्री नीतू कपूर यांचा कोविड 19 टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या 'जुग जुग जियो' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चंदीगडल्या गेल्या होत्या. तेथेच त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली आणि त्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट झाली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एअर अॅम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीतू कपूर यांची प्रकृती ठिक आहे.

धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करत आहेत. ताज्या माहितीनुसार, त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी सकाळी सेटवर उपस्थित लोकांनीदेखील या बातमीला दुजोरा दिला. यापूर्वी किआरा आडवाणीदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची अफवा पसरली होती. नंतर टीमने ती ठीक असल्याचे सांगितले होते. आता किआराचा रिपोर्ट निगेटिव्ह असून टीममधील वरुण, राज आणि नीतू पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी भास्करने याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र इतर टीम पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीवर मॅनेजरने काही स्पष्ट सांगितले नाही. सेटवरील उपस्थित लोकांनी दिव्य मराठीला सांगितले, इतर क्रू मेंबर्ससोबतच दर आठवड्याला कलाकारांसोबतच दिग्दर्शकाची कोरोना तपासणी होत होती. गुरुवारी नवीन तपासणीत वरुण, नीतू आणि राज हे पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

अनिल कपूर यांचा कोविड 19 चा रिपोर्ट निगेटिव्ह
दुसरीकडे शुक्रवारी दुपारपर्यंत अनिल कपूरदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी होती, मात्र त्यांनी सोशल मीडियावर ही बातमी फेटाळली. आपल्या सोशल मीडिया स्टोरीत अनिल यांनी लिहिले की, "अफवांना पूर्णविराम देण्यासाठी... माझी कोविड -19 ची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. काळजी आणि प्रार्थनाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." वृत्तानुसार, अनिल चंदीगडहून मुंबईला परतले आहेत.

याची पुष्टी करताना बोनी कपूर म्हणाले, "अनिल कपूरचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे." या चित्रपटाचे शूटिंग सध्या थांबविण्यात आले आहे. सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांची कोविड टेस्ट केली जात आहे.

नीतू एक दिवस आपल्या रुममध्येच थांबल्या
कोविड 19 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर नीतू कपूर चंडीगडमधील हॉटेलच्या एका रुममध्ये क्वारंटाइन झाल्या होत्या. मात्र, रणबीरने त्यांना खास विमानाने मुंबईत आणले.

ऋषी यांच्या निधनानंतर नीतू यांचा हा पहिला चित्रपट

यावर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांचा 'जुग-जुग जियो' हा पहिला चित्रपट आहे. शूटसाठी रवाना होताना नीतू यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिले होते, "या कठीण काळातली माझी पहिली फ्लाइट. मी या प्रवासाबद्दल थोडी घाबरले आहे." पुढे त्यांनी ऋषी कपूर यांची आठवण करुन लिहिले, "कपूर साहेब, माझा हात धरायला तुम्ही इथे नाहीत, पण मला माहित आहे की तुम्ही कायम माझ्याबरोबर आहात."

‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नीतू कपूर बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात वरुण धवन, कियारा आडवाणी, प्राजक्ता कोळी ही कलाकार मंडळीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser