आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग:ऋषी कपूरच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी साइन केला चित्रपट, साकारणार वरुण धवनच्या आईची भूमिका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात अनिल कपूर नीतू सिंग यांच्या पतीची भूमिका वठवणार आहेत.

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी नीतू कपूर पुन्हा चित्रपटात काम करू इच्छित आहे. त्यांनी वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या आगामी कॉमेडी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रानुसार, राज मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या चित्रपटासाठी त्यांना घेण्यात आले. मात्र अद्याप चित्रपटाचे नाव जाहिर झाले नाही.

या चित्रपटात त्या वरुण धवनच्या आईची भूमिका साकारणार आहेत. आणखी एक मोठे नावही यात जोडले गेले आहे. ते म्हणजे अनिल कपूर यांचे, ते या चित्रपटात नीतू कपूर यांचे पती आणि वरुणचे वडील साकारणात आहेत. हा एक रोमँटिक विनोदी चित्रपट असेल, अशी माहिती आहे. ऑक्टोबरच्या शेवटी यावर काम सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...