आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेते ऋषी कपूर आता आपल्यात नाहीत. 30 एप्रिल रोजी त्यांनी मुंबईतील एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कपूर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः त्यांच्या पत्नी नीतू सिंग यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. पण स्वतःला सावरत त्यांनी ऋषी यांच्यावर अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणा-या डॉक्टरांविषयी ऋण व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहून एचएन हॉस्पिटलच्या डॉक्टर्स, नर्सेसचे आभार मानले आहेत.
'डॉक्टरांनी आपला समजून त्यांची काळजी घेतली'
नीतू कपूर यांनी दोन फोटो पोस्ट केले आहेत. “एक कुटुंब म्हणून आपल्याला खूप नुकसान झाले आहे. जेव्हा आम्ही एकत्र बसून काही महिन्यापूर्वीच्या भूतकाळात डोकावतो, तेव्हा एच.एन. रिलायन्स रुग्णालयामधील डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी वाटत आहे. डॉ. तरंग ज्ञानचंदांनी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टर, परिचारिका आणि संपूर्ण टीमने माझे पती ऋषी कपूर यांना त्यांचाच माणूस असल्यासारखे सांभाळले. त्यांनी नेहमीच आम्हाला त्यांचाच भाग असल्यासारखे सल्ले दिले. या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते,” असे यांनी म्हटले आहे.
नीतू यांनी आपल्या अंदाजात ऋषी यांना दिला होता अखेरचा निरोप
यापूर्वी 2 मे म्हणजेच शनिवारी नीतू यांनी सोशल मीडियावर ऋषी यांचा एक फोटो शेअर करुन त्यांना अखेरचा निरोप दिला होता. या फोटोत ऋषी यांच्या हातात व्हिस्कीचा ग्लास आणि चेह-यावर स्मितहास्त होते. "आमच्या कहाणीचा शेवट झाला", असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले होते.
A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on May 1, 2020 at 11:20pm PDT
>
रविवार नीतू यांनी त्याच्या पालीहिल स्थित राहत्या घरी ऋषी यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात नीतू आणि त्यांचा मुलगा रणबीर यांच्या मध्ये ऋषी यांचा फोटो ठेवला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.