आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऋषी-नीतू यांची वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:वयाच्या 14 व्या वर्षीच ऋषी कपूरच्या प्रेमात पडल्या होत्या नीतू,  स्वतःच्याच लग्नात दोघेही पडले होते बेशुद्ध

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता नीतू यांच्याजवळ फक्त ऋषी यांच्या आठवणी आहेत.

ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नाचा आज वाढदिवस असून त्यांच्या लग्नाला 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. ऋषी कपूर यांचे मागील वर्षी कॅन्सरमुळे निधन झाले होते. आता नीतू यांच्याजवळ फक्त ऋषी यांच्या आठवणी आहेत. ऋषी त्यांच्या लग्नाचा दिवस आयुष्यातील सर्वात मोठा दिवस मानत असे. ते आपल्याच लग्नात बेशुद्ध पडले होते, हे फार कमी जणांना ठाऊक असवे. केवळ ऋषीच नव्हे तर नीतू सिंह यादेखील लग्नात भोवळ येऊन पडल्या होत्या. दोघांच्याही बेशुद्ध पडण्याची कारणे वेगळी होती.

लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषी-नीतू
22 जानेवारी 1980 रोजी ऋषी कपूर आणि नीतू सिंग लग्नगाठीत अडकले होते. या लग्नात बॉलिवूडमधील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. दोघांचेही लग्न धुमधडाक्यात पार पडले होते. या दोघांच्या लग्नात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली होती. याबद्दल खूद्द नीतू यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. नीतू यांनी सांगितल्यानुसार, लग्नाच्या वेळी त्या बेशुद्ध पडल्या होत्या. ऋषी कपूर यांनासुद्धा लग्नात भोवळ आली होती. लग्नात नीतू यांनी परिधान केलेला लहेंगा खूपच जड होता. तो लहेंगा सांभाळता सांभाळता त्यांच्या नाकी नऊ आले होते. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या. तर ऋषी कपूर त्यांच्या अवतीभोवती जमलेल्या गर्दीमुळे हैराण झाले होते. घोडीवर चढण्यापूर्वीच त्यांना भोवळ आली होती.

वयाच्या 14 व्या वर्षीपासून ऋषी कपूर यांना डेट करत होत्या नीतू
ऋषी कपूर आणि नीतू सिंह बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल्सपैकी एक होते. 'जहरिला इन्सान' या सिनेमात ही जोडी पहिल्यांदा झळकली होती. खरं तर हा सिनेमा फार चालला नाही, मात्र या सिनेमामुळेच हे दोघे जवळ आहे. नीतू 14 वर्षांच्या असल्यापासून ऋषी यांना ओळखत होत्या. हा तोच काळ होता, जेव्हा त्यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते.

गमतीची गोष्ट म्हणजे ऋषी कपूर सेटवर नीतू यांची जाणूनबूजून छेड काढत असे. कधीकधी नीतू त्यांना वैतागून जायच्या. त्यानंतर हळूहळू नीतू यांनी ऋषी कपूर यांची ही सवय आवडू लागली आणि 'खेल खेल में' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोघांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत होऊ लागली होती.

नीतू यांना हवा होता 'बॉबी'मध्ये रोल
नीतू यांना आर. के. बॅनर्सच्या 'बॉबी' या सिनेमात लीड भूमिका हवी होती. मात्र डिंपल कपाडियाने ही बाजी मारली. खरं म्हणजे राज कपूर यांना 'बॉबी'साठी नवीन आणि फ्रेश चेहरा हवा होता. त्याकाळात नीतू सिंह इंडस्ट्रीत स्थिरावल्या होत्या. त्यामुळे राज कपूर यांनी नीतू यांची निवड या सिनेमासाठी केली नव्हती. मात्र नंतर नीतू आणि ऋषी यांनी ब-याच सिनेमांमध्ये एकत्र काम केले. 'रफू चक्कर', 'दूसरा आदमी', 'कभी-कभी', 'अमर अकबर एंथोनी' या सिनेमातील दोघांची जोडी प्रेक्षकांना भावली.

राज कपूर म्हणाले होते, प्रेम आहे, तर लग्न करा..
ऋषी आणि नीतू यांच्या प्रेमाचे किस्से बॉलिवूडमध्ये चांगलेच रंगू लागले होते. नीतू यांचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरु झाले होते. याकाळात ऋषी यांच्यासोबतच सिनेमे करण्यावर नीतू यांनी भर दिला होता. नीतू यांना ऋषी कपूर यांच्यासोबत लग्न करायचे होते, ही गोष्ट राज कपूर यांच्यासह घरातील ब-याच जणांना ठाऊक होती. राज कपूर यांनी ऋषी यांना म्हटले होते, जर नीतूवर प्रेम असेल तर तिच्याशीच लग्न कर.

बातम्या आणखी आहेत...