आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सलमान खानचे तीन गाजलेले चित्रपट सुल्तान, टाइगर जिंदा है आणि भारत मध्ये गाणी गाऊन लोकप्रिय झालेल्या नेहा भसीनने लहानपणी आपले आपले लैंगिक शोषण झाल्याचा दावा केला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने 10 वर्षांची असताना आपल्यासोबत झालेला अतिशय किळसवाणा प्रसंग सांगितला. ही घटना आपल्या आईसोबत हरिद्वारमध्ये असताना घडल्याचे तिने सांगितले आहे.
हरिद्वारमध्ये आईसोबत होते तेव्हा एकाने मागून...
वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेहा भसीन (37) म्हणाली - त्यावेळी मी फक्त 10 वर्षांचे होते. देशातील प्रमुख धार्मिकस्थळांपैकी एकक हरिद्वारमध्ये मी आपल्या आईसोबत होते. आई माझ्यापासून थोडी दूर थांबली होती. त्यावेळी एका अनोळखीने माझ्या मागे येऊन चुकीच्या पद्धतीने बोट लावला होता. अचानक घडलेल्या या अतिशय किळसवाण्या प्रकाराने ती तेथून दूर पळाली होती. या घटनेच्या काही वर्षांनंतर एका हॉलमध्ये अन्य एका माणसाने माझ्या छातीवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. मला आजही तो क्षण आठवून अंगावर काटा येतो. मला वाटायचे की माझीच काही तरी चूक असणार!
सोशल मीडियावर मिळाली बलात्काराची धमकी
आता लोक सोशल मीडियावर येऊन इतरांना मानसिक, शारीरिक, भावनिक आणि धार्मिकरित्या छळतात. मी तर म्हणते हा विना चेहऱ्याचा दहशतवादच आहे. नेहाने पुढे सांगितले, की तिने कधीच के-पॉप बँड संदर्भात काही कमेंट केली नव्हती. तिने केवळ इतकेच म्हटले होते की एक बँड मला आवडत नाही. यानंतर मला ट्रोल करण्यात आले. मला बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. तिने यासंदर्भात पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल केली.
नेहा पुढे सांगते, की घटनांनी तिला 'कहंदे रहंदे' गाणे रचण्यास प्रेरित केले होते. हे गाणे ट्रोलिंगच्या विरोधात आहे. महिलांविषयी समाज किती रुढीवादी आहे हे सुद्धा दाखवण्याचा यात प्रयत्न करण्यात आला आहे. चुकीचे होत असेल तर ते कुणीही सहन का करावे. चुकीच्या कामांविरुद्ध आवाज उठवायलाच हवा असे नेहा सांगते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.