आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी दुस-यांदा आईबाबा होणार आहेत. ही गोड बातमी नेहाने सोमवारी सोशल मीडियावर शेअर केली. यासह नेहाने पती अंगद आणि मुलगी मेहरसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत नेहाचे बेबी बंप दिसत आहेत. हा फोटो शेअर करत नेहाने लिहिले, ‘या फोटोला काय कॅप्शन द्यायचे हा विचार करण्यात दोन महिने गेले… आम्ही विचार केलेले सर्वात चांगले कॅप्शन म्हणजे.. देवा तुझे आभार.’ नेहाच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
गरोदरपणात काम करत आहे नेहा
नेहा धुपियाने गरोदरपणात कामापासून ब्रेक घेतलेला नाही. दोन दिवसांपूर्वीच तिने सेटवर परतल्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. याशिवाय तिने एक मोठा प्रोजेक्ट सुरु होत असल्याचेही सांगितले होते.
मुलीच्या जन्माच्या वेळी आणि लग्नाच्या वेळी ट्रोल झाली होती नेहा
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांची 10 मे 2018 रोजी लग्न केले होते. तर त्यांची मुलगी मेहरचा जन्म 18 नोव्हेंबर 2018 रोजी झाला होता. नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट झाली होती. त्यामुळे दोघांनी घाईघाईने लग्न केले होते. नेहा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याचा खुलासा स्वतः अंगदने केला होता.
डेटिंगच्या 1 वर्षानंतर केले होते लग्न
नोव्हेंबर 2017 मध्ये नेहा आणि अंगद क्रिकेटर झहीर खान आणि सागरिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनला एकत्र पोहोचले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळी मात्र दोघांनीही रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले नव्हते. वर्षभराच्या डेटिंगनंतर मे 2018 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.