आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लूक आउट:आगामी थ्रिलर 'ए थर्सडे'मध्ये नेहा धूपिया दिसणार गर्भवती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'ए थर्सडे' हा चित्रपट गुरूवारी घडणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे.

रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपीने ब्लू मंकी फिल्म्ससोबतच्या आपल्या आगामी डायरेक्ट-टू-डिजिटल थ्रिलर 'ए थर्सडे'मधील अभिनेत्री नेहा धुपियाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. या चित्रपटात नेहा एका गर्भवती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.बेहजाद खंबाटाद्वारे लिखित आणि दिग्दर्शित 'ए थर्सडे' हा चित्रपट गुरूवारी घडणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे.

नेहा धूपियाने आपल्या सोशल मीडियावर आपला हा नवा लुक शेअर केला आहे. नेहा एसीपी कॅथरीन अल्वारेज नावाच्या गर्भवती असलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून तिची ही अनोखी व्यक्तिरेखा पाहण्यासारखी असेल.

'ए थर्सडे' हा चित्रपट एका प्ले-स्कूल शिक्षिकेच्या कहाणीवर आहे, जी 16 मुलांना बंधक बनवते. या थ्रिलरमध्ये यामी गौतम, डिंपल कपाडिया, अतुल कुलकर्णी आणि माया सराओ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

विशेष म्हणजे पडद्यावर प्रेग्नेंट स्त्रीची भूमिका वठवणारी नेहा प्रत्यक्षात दुस-यांदा आई होणार आहे. अलीकडेच नेहा आणि तिचा पती अंगद बेदी यांनी त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. नेहा आणि अंगद यांचे हे दुसरे बाळ आहे. त्यांना मेहर नावाची एक मुलगी आहे.

बातम्या आणखी आहेत...