आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फर्स्ट मंथ अ‍ॅनिव्हर्सरी:नेहा-रोहनच्या लग्नाला एक महिना पूर्ण, व्हिडिओ शेअर करुन नेहा म्हणाली - माझ्यावर एवढे प्रेम करण्यासाठी तुझे मनापासून आभार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 ऑक्टोबर रोजी दिल्लीत दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंग यांच्या लग्नाला आज (25 नोव्हेंबर) एक महिना पूर्ण झाला आहे. 25 ऑक्टोबर रोजी दिल्लीत दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.लग्नानंतर हे दोघे सध्या दुबईत हनिमून साजरा करत आहेत. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करुन रोहनचे आभार मानले आहेत.

नेहाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “आज आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला. माझ्यावर एवढे प्रेम करण्यासाठी तुझे आणि तुझ्या कुटुंबीयांचे मनापासून आभार.” या व्हिडिओत दोघांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळतोय.

रोहनने देखील नेहासोबतचा फोटो शेअर करुन तुझ्यासोबत आयुष्य खूप सुंदर झालंय, असे म्हटले आहे.

'नेह दा व्याह' या गाण्याच्या शूटिंग सेटवर पहिल्यांदा रोहन आणि नेहा यांची भेट झाली होती. येथेच त्यांच्यात प्रेमांकुर फुलले आणि हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser