आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्म:नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंग यांची रोका सेरेमनी झाली, व्हिडिओत भांगडा करताना दिसले नेहूप्रीत; व्हिडिओ शेअर करुन नेहा म्हणाली...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहाने तिच्या रोका सेरेमनीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर येत्या 24 ऑक्टोबर रोजी राइजिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंगसोबत विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र आता तिचे लग्न ठरले असून रोहनसोबत तिचा साखरपुडा झाल्याचे कन्फर्म झाले आहे. स्वतः नेहाने या सेरेमनीचा पहिला व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. यात नेहा आणि रोहन भांगडा करताना भरपूर एन्जॉय करताना दिसत आहेत.

नेहा आणि रोहन प्रीत यांचे ‘नेहू दा व्याह’ हे गाणे 21 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. तत्पूर्वी चाहत्यांना भेट म्हणून नेहाने तिच्या रोका सेरेमनीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासह नेहाने रोहन प्रीत आणि त्याच्या कुटुंबावरचे प्रेम व्यक्त करताना आपल्या आईवडिलांचे आभार मानले आहेत. नेहाने लिहिले, ''नेहू दा व्याह व्हिडिओ उद्या रिलीज होत आहे, तोपर्यंत नेहार्ट (नेहाचे चाहते) आणि नेहूप्रीत वर प्रेम करणा-यांसाठी एक छोटीशी भेट आहे. ही आमच्या रोका सेरेमनीची क्लिप आहे. माझे रोहन प्रीत आणि त्याचे कुटुंबावर प्रेम आहे. मिस्टर कक्कर आणि मिसेस कक्कर अर्थातच माझे आई वडील तुमचे खूप खूप आभार. एवढा सुंदर इव्हेंट तुम्ही केला त्याबद्दल धन्यवाद'', अशा आशयाची पोस्ट तिने टाकली आहे.

सेरेमनीमध्ये नेहाने फिकट गुलाबी रंगाचा इंडो-वेस्टर्न डिझायनर ड्रेस परिधान केला आहे. सोबत तिने हिरव्या रंगाची ओढणी देखील घेतली आहे. रोका सोहळ्यादरम्यान तिला गुलाबी रंगाची ओढणी घातली गेली. रोहन प्रीतनेदेखील फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता पायजामा आणि गडद गुलाबी रंगाची पगडी परिधान केली.

  • एकमेकांचा हात धरून घेतली एन्ट्री

नेहा - रोहन प्रीतने रोका सेरेमनीत एकमेकांचा हात हात धरुन एन्ट्री घेतली होता. या सोहळ्याला दोघांच्या नातेवाईकांनी हजेरी लावली. एन्ट्री दरम्यान नेहा आणि रोहन प्रीत यांनी ढोल ताशांच्या गजरात भांगडा केला. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधीचा पहिला व्हिडिओ समोर आल्यानंतर इंडस्ट्रीतील मित्रांनी दोघांचे अभिनंदन केले आहे.

नेहा कक्कर 24 ऑक्टोबर रोजी रोहन प्रीतशी लग्न करणार आहेत. या अगोदर दोघेही 22 ऑक्टोबरला नोंदणी पद्धतीने विवाह करतील.

बातम्या आणखी आहेत...