आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रीगल हनीमून:दुबईतील एटलांटिस द पाममध्ये हनीमून साजरा करत आहेत नेहा कक्कर आणि रोहनप्रीत, येथील एका दिवसाचे भाडे आहे एक लाख रुपये

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून हे दोघेही रीगल स्वीट सूइटमध्ये थांबले असल्याचे दिसून येते.

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग दुबईमध्ये हनिमून साजरा करत आहेत. 24 ऑक्टोबर रोजी त्यांचे लग्न झाले होते. नेहा आपल्या हनीमूनचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिने फोटोमध्ये टॅग केलेले ठिकाण दुबईतील एटलांटिस द पाम हे आहे. येथे दर दिवसासाठी हे दोघे 1 लाख रुपये खर्च करत आहेत.

द पाममध्ये या रेंजमध्ये उपलब्ध आहेत रुम

रोहनप्रीत सिंग आणि नेहाने इंस्टाग्रामवर एटलांटिसचे अनेक फोटो शेअर केले आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पाममधील दोन लोकांसाठी एका दिवसाचे कमीत कमी भाडे हे 26 हजार 834 रुपये आहे. तर सर्वात जास्त किंमत म्हणजेच प्रेसिडेंशल सूटची किंमत 3 लाख 21 हजार चारशे चौदा रुपये आहे. उर्वरित स्वीट्सची रेंज प्रती दिन 60 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे.

रीगल सूइटमध्ये थांबले आहेत नेहा-रोहन

नेहाच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून हे दोघेही रीगल स्वीट सूइटमध्ये थांबले असल्याचे दिसून येते. एटलांटिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार या रीगल सूइट रूमसाठी प्रती दिन 72 हजार 403 रुपये भाडे आहे. जर तुम्ही ब्रेकफास्ट केला तर ही किंमत 89 हजार 370 रुपयांपर्यंत जाते. त्याचबरोबर तुम्ही रात्रीचे जेवण केले तर ही किंमत 1 लाख 1 हजार 813 रुपयांपर्यंत जाते.

हॉटेलने केली होती विशेष व्यवस्था
नेहाने मंगळवारी लक्झरी हॉटेलने त्यांच्यासाठी केलेल्या खास व्यवस्थेचे फोटोही शेअर केले. ज्यामध्ये हे दोघे हॉटेलच्या खासगी बीचवर दिसले. यापूर्वीच्या फोटोंमध्ये नेहा आणि रोहनच्या वेलकमची झलक बघायला मिळते. ज्यामध्ये त्यांच्यासाठी चॉकलेट, केक आणि इतर लक्झरी सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...