आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहू दा व्याह:दिल्लीत रजिस्टर्ड मॅरेज करणार नेहा कक्कर आणि रोहनप्रीत, त्यानंतर मोहालीतील जीरकपूर होणार लग्नसोहळा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये हे दोघे नोंदणी पद्धतीनेही विवाह करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर येत्या 26 ऑक्टोबर रोजी रोहनप्रीत सिंगसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये हे दोघे नोंदणी पद्धतीनेही विवाह करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी फक्त नेहा आणि रोहनचे कुटुंबीय उपस्थित असतील. लग्नाआधी म्हणजे 21 ऑक्टोबरला रोहन आणि नेहा यांचा 'नेहू दा व्याह' हा अल्बम रिलीज होणार आहे.

खरं तर नेहा आणि रोहन यांच्या लग्नाच्या बातम्या फक्त साँग प्रमोशनचा एक स्टंट असल्याचा अंदाज आधी वर्तवला गेला होता. पण आता दोघांची लग्नपत्रिकाही समोर आली आहे. लग्नपत्रिकेनुसार नेहा आणि रोहन यांचे लग्न 26 ऑक्टोबर 2020 रोजी सेटेलाइट टाऊन नावाने प्रसिद्ध जीरकपूर (जिल्हा - मोहाली, पंजाब) येथे होणार आहे. पत्रिकेत दोघांच्या नावासह त्यांच्या पालकांच्या नावांचा उल्लेख आहे.

दोघांनीही 9 ऑक्टोबर रोजी एकच फोटो आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करुन आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती. याआधीही रोहनप्रीतच्या कुटुंबासोबतचे नेहाचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यावरुन नेहाची रोका सेरेमनी झाल्याचे समोर आले होते.

अलीकडेच रोहनने नेहासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. त्यासह त्याने लिहिले होते, 'तू माझी आहेस, फक्त माझी. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो नेहू प्रीत. नेहू दा व्याह'.

बातम्या आणखी आहेत...