आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्करने शुक्रवारी बेबी बंप फ्लॉन्ट करत पती रोहनप्रीत सिंग सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे नेहा आणि रोहनप्रीतच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आता स्वतः नेहाने या पब्लिसिटी स्टंटवरुन पडदा उचलला आहे. शनिवारी नेहाने तोच फोटो शेअर करत 22 डिसेंबर रोजी ख्याल रख्या कर हे नवीन गाणे रिलीज होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेहा आता प्रेग्नेंट नसून फोटो शेअर करणे हे तिच्या ‘ख्याल रख्या कर’या आगामी गाण्याचे प्रमोशन होते, हे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडिया यूजर्स चिडले
‘ख्याल रख्या कर' हे नवे गाणे 22 डिसेंबरला येत आहे’ असे कॅप्शन देत नेहाने रोहनसोबतचा आपला फोटो शेअर केला आहे. या पब्लिसिटी स्टंटमुळे नेहाचे चाहते तिच्यावर चिडले आहेत. नेहाच्या या पोस्टवर भाष्य करत ते आपला संताप व्यक्त करत आहेत. एका नेटक-याने लिहिले 'तुम्ही पब्लिसिटीसाठी अशा गोष्टींची खिल्ली कशी काय उडवू शकता? मी तुमचा मोठा चाहता होतो. मात्र जर तुम्ही फक्त हे गाण्याच्या पब्लिसिटीसाठी केलं असेल, तर मात्र तुमचा धिक्कार आहे,' अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एका यूजरने लिहिले, 'चीप पब्लिसिटीची मर्यादा असते. हे तुम्ही पहिलेच का सांगितले नाही.'
शुक्रवारी ही होती नेहाची पोस्ट
नेहा कक्कर आणि तिचा नवरा रोहन प्रीत सिंग यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये नेहा बेबी बंप दाखवतेय. कॅप्शनमध्ये तिने नव-याला उद्देशून "अब ख्याल रखा कर," असे म्हटले होते. रोहनने नेहाच्या फोटोवर कमेंट करताना हे दोघे लवकर आईबाबा होणार असल्याचे संकेत दिले होते. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट रोहनप्रीतने केली. तर नेहाचा भाऊ टोनी कक्करने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, 'मी मामा होणार आहे.'
24 ऑक्टोबर रोजी झाले लग्न
नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. दोघांची पहिली भेट काही महिन्यांपूर्वी 'आजा चल ब्याह करवाएं, लॉकडाउन विच कत्त होने खर्च' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान झाली होती. रोहन प्रीत सिंग 2019 मध्ये 'इंडियाज राइजिंग स्टार'च्या तिस-या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. याशिवाय तो 'मुझसे शादी करोगे' या रिअॅलिटी शोमध्येही झळकला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.