आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा कक्करचा पब्लिसिटी स्टंट:नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीची बातमी ही केवळ एक अफवा, नवीन म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठी खोटा बेबी बंप दाखवला?

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहा-रोहनच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनसाठी हा एक पब्लिसिटी स्टंट

'इंडियन आयडॉल' या सांगीतिक कार्यक्रमाची परीक्षक आणि पार्श्वगायिका नेहा कक्कर आणि तिचा नवरा रोहन प्रीत सिंग यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये नेहा बेबी बंप दाखवत आहे. कॅप्शनमध्ये तिने नव-याला उद्देशून "अब ख्याल रखा कर," असे म्हटले आहे. तेव्हापासून ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, नेहा आणि रोहनच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनसाठी हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

नेहा कक्करची पोस्ट

'इंडियन आयडॉल' या सेटशी संबंधित काही सूत्रांनी एका इंग्रजी न्यूज वेबसाइटला सांगितले की, नेहा आणि रोहनचा हा फोटो त्यांच्या आगामी म्युझिक व्हिडिओच्या शूटचा आहे. हा व्हिडिओ असीम रियाज आणि हिमांशी खुराणा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या 'ख्याल रखा कर' या गाण्याचे नवीन व्हर्जन आहे. हे गाणे नेहा आणि रोहनवर चित्रित झाले आहे.

म्हणून अंदाज वर्तवला गेला
रोहनने नेहाच्या फोटोवर कमेंट करताना हे दोघे लवकर आईबाबा होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट रोहनप्रीतने केली. तर नेहाचा भाऊ टोनी कक्करने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, 'मी मामा होणार आहे.'

अनेक सेलिब्रिटींनी दिल्या नेहा-रोहनला शुभेच्छा
नेहाचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता आणि टीव्ही होस्ट जय भानूशालीने लिहिले, 'नेहा आणि रोहन खूप खूप शुभेच्छा' तर संगीतकार रोचक कोहलीने लिहिले, 'मुबारकां.'

टीव्ही अभिनेत्री कनिका मानने दोघांना खूप खूप शुभेच्छा, असे म्हटले आहे. गायिका हर्षदीप कौरनेही दोघांचे अभिनंदन केले आहे. एली अवराम, करिश्मा तन्ना आणि रिद्धिमा तिवारीसह अनेक सेलिब्रिटींनी नेहा आणि रोहन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

24 ऑक्टोबर रोजी झाले लग्न
नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. दोघांची पहिली भेट काही महिन्यांपूर्वी 'आजा चल ब्याह करवाएं, लॉकडाउन विच कत्त होने खर्च' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान झाली होती. रोहन प्रीत सिंग 2019 मध्ये 'इंडियाज राइजिंग स्टार'च्या तिस-या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. याशिवाय तो 'मुझसे शादी करोगे' या रिअॅलिटी शोमध्येही झळकला होता.

बातम्या आणखी आहेत...