आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअ‍ॅक्शन:प्रेग्नेंसीच्या अफवांवर नेहा कक्कड म्हणाली - मी आणि रोहनने अजून फॅमिली प्लॅनिंगचा विचार केला नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहा गरोदर असल्याची चर्चा होती.

बॉलिवूड गायिका नेहा कक्कड नुकतीच 'डान्स दीवाने 3’च्या एका विशेष भागात दिसली. या वेळी ती म्हणाली, मी आणि माझे पती रोहनप्रीत सिंहने अजून कुटुंब नियोजनाचा विचार केलेला नाही. खरं तर, नेहा गरोदर असल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे ती खूच चर्चेत होती. शिवाय तिने अचानक 'इंडियन आयडॉल 11’मधून ब्रेक घेतला होता, त्यामुळे ती गरोदर असल्याची चर्चा होती. त्यामुळे तिने यात यावर खुलासा केला.

मुलांसोबत केली खूप धमाल
शोमध्ये स्पर्धक गुंजनने लुंगी डान्सवर नृत्य सादर केले. ते पाहून नेहाने तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाली, रोहू आणि मी अजून बाळाचा विचार केला नाही, मात्र कधी केला तर आम्हालाही गुंजनसारखे बाळ व्हावे. नेहाचे नुकतेच 'कांटा लगा’ हे गाणे रिलीज झाले. ते सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले. शोमध्ये आपला भाऊ टोनी कक्कड आणि रॅपर हनीसिंह सोबत आली होती. यावेळी तिने मुलांसोबत धमाल केली आणि डान्सही केला.

याआधी पसरली होती अशीच बातमी
नेहा आणि रोहनप्रीत यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न केले होते. लग्नानंतर फक्त दोन महिन्यांनी, नेहाने ती गरोदर असल्याचा फोटो शेअर केला होता, तेव्हादेखील ती गरोदर असल्याची अफवा पसरली होती. नंतर मात्र तिने हे सर्व एका म्युझिक व्हिडिओसाठी केल्याचे सांगितले होते. त्या व्हिडिओचे नाव 'ख्याल राख्या कर' असे होते. मात्र, नेहाने नुकतेच एका कार्यक्रमात आम्ही दोघेही अजून तरी बाळाचा विचार करत नसल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...