आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा कक्कर हनीमूनसाठी रवाना:लग्नाच्या 15 दिवसांनी हनीमूनसाठी दुबईत पोहोचली नेहा कक्कर, रोहनप्रीतसोबतचे व्हेकेशन फोटो केले शेअर

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 ऑक्टोबर रोजी झाले लग्न

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग लग्नाच्या 15 दिवसानंतर हनीमूनसाठी दुबईला गेले आहेत. दोघांनीही मुंबई विमानतळ ते दुबई हॉटेलपर्यंतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहाने मुंबई विमानतळावर कॉफी पित असताना तिचा फोटो शेअर केला. यानंतर तिने दुबईतील पलाजो व्हर्साचे हॉटेलच्या रुमची झलकही दाखविली जिथे ती सध्या राहतेय. रुम फुलांनी सजवण्यात आली आहे.

तत्पूर्वी 4 नोव्हेंबरला या दोघांनी लग्नानंतर पहिला करवाचौथ साजरा केला. नेहाने एक फोटो शेअर केला होता, ज्यात ती रेड सूटमध्ये दिसली होती. रोहनप्रीत पांढ-या रंगाच्या शेरवानी आणि शॉलमध्ये दिसला होता.

24 ऑक्टोबर रोजी झाले लग्न
नेहा-रोहनप्रीतचे 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीत लग्न झाले होते. दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये हळद, मेहंदी आणि संगीत हे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पंजाबी पद्धतीने हे दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर दोन वेडिंग रिसेप्शन झाले. पहिले रिसेप्शन रोहप्रीतच्या चंदीगडमधील घरी तर दुसरे रिसेप्शन मुंबईत झाले.

बातम्या आणखी आहेत...