आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहू-प्रीत दा व्याह:नेहा कक्करने सांगितले कशी होती रोहन प्रीतच्या कुटुंबासोबतची पहिली भेट, क्यूट कपलचा व्हिडिओ झाला व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेहाने एका व्हिडिओच्या माध्यमातून रोहन प्रीतच्या कुटुंबासोबतची तिची पहिली भेट कशी होती, हे दाखवले आहे.

लोकप्रिय गायिका नेहा कक्करने तिच्या लग्नाच्या निर्णयाने सर्वांना चकित केले आहे. वृत्तानुसार, नेहा 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राइजिंग स्टार फेम रोहन प्रीत सिंगसोबत लग्न करणार आहे, त्यापूर्वी त्यांचे 22 ऑक्टोबर रोजी नोंदणी पद्धतीने दिल्लीत लग्न होणार आहे. दरम्यान, आता नेहाने एका व्हिडिओच्या माध्यमातून रोहन प्रीतच्या कुटुंबासोबतची पहिली भेट कशी होती, हे दाखवले आहे. सोबतच भावी नव-याचा हात हातात धरून नेहा एक्साइटेडही दिसत आहे.

नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर रोहनच्या कुटुंबासोबतच्या पहिल्या भेटीचा व्हिडिओ शेअर करुन लिहिले, 'तो दिवस जेव्हा त्याने मला त्याच्या आई-वडील आणि कुटुंबीयांशी ओळख करून दिली. लव्ह यू रोहन प्रीत. नेहू-प्रीत', अशी पोस्ट नेहाने लिहिली आहे.

कुटुंबासोबतच्या पहिल्या भेटीचा व्हिडिओ रोहननेदेखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. यासह त्याने रोमँटिक अंदाजात लिहिले, 'ती पहिल्यांदाच आमच्या घरी आली होती. आजचा दिवस माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे मी शब्दात सांगू शकत नाही. जणू संपूर्ण जगानेच माझा हात धरला होता. नेहू, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. अनंतापर्यंत प्रेम करत राहील.' यावर प्रतिक्रिया देताना नेहाने लिहिले होते, 'बेबी, मी काय बोलू, मी फक्त म्हणेन की मी खूप भाग्यवान आहे. टचवुड'.

काही दिवसांपूर्वी नेहा आणि रोहन प्रीत यांच्या या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. छायाचित्रांवरुन नेहा आणि रोहन प्रीत यांचा गेल्या महिन्यातच रोखा झाला, असे म्हटले गेले होते. मात्र हा अंदाज चुकीचा होता. नेहाने हा रोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नेहा कक्कर 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीत एका भव्य सोहळ्यात रोहनसोबत विवाहबद्ध होणार आहे. त्यांची लग्नपत्रिकादेखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लग्नाची तयारी पूर्ण झाली असून लग्नाला दोघांचेही जवळचे लोक उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...