आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहू दा व्याह:लग्नाची चर्चा सुरु असताना नेहा कक्करने रोहन प्रीतसोबतचा फोटो केला शेअर, डायमंड रिंगने वेधले सगळ्यांचे लक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोघांचा रोका झाल्याची शक्यता वर्तवली गेली होती.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. राइजिंग स्टार फेम रोहन प्रीत सिंगसोबत नेहा लग्न करणार असल्याचे म्हटले जात असताना आता तिने याबाबत हिंट दिली आहे. नेहाने तिच्या आगामी नेहू दा व्याह या गाण्यातील आपला पहिला लूक शेअर केला आहे. मात्र या फोटोवरुन नेहा खरंच लग्न थाटणार आहे की फक्त गाण्याच्या प्रमोशनसाठी नवी कल्पना योजली आहे, याबद्दल संभ्रम आहे.

नेहाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रोहन प्रीतसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे ज्यात हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. फोटो शेअर करुन नेहाने लिहिले, 'जेव्हा आपण भेटलो रोहनप्रीत. पहिल्या नजरेतील प्रेम. नेहू दा व्याह, नेहूप्रीत '. यासह नेहाच्या बोटातील डायमंड रिंगनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डायमंड रिंग बघता नेहा आणि रोहन यांचा साखरपुडा झाल्याचीही चर्चा रंगतेय.

नेहाच नव्हे तर रोहन यानेदेखील दोघांचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. त्यासह लिहिले, 'तू माझी आहेस, फक्त माझी. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो नेहू प्रीत. नेहू दा व्याह'. नेहा आणि रोहन यांचे ‘नेहू दा व्याह’ हे गाणे 21 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. यापूर्वी हे दोघे डायमंड दा छल्ला या गाण्यात एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या.

बातम्यांनुसार, येत्या 21 ऑक्टोबर रोजी नेहा दिल्लीत गायका रोहन प्रीतशी लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांचेही वाटप झाले आहे. अलीकडेच नेहा आणि रोहन यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे एक छायाचित्र व्हायरल झाले होते, त्यावरुन दोघांचा रोका झाल्याची शक्यता वर्तवली गेली होती.

बातम्या आणखी आहेत...