आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहा कक्कर खरंच लग्न करतेय?:रिपोर्ट्समध्ये दावा - येत्या 24 ऑक्टोबर रोजी राइजिंग स्टार फेम रोहनप्रीत सिंगशी लग्न करणार आहे नेहा कक्कर, काही महिन्यांपूर्वी झाली होती दोघांची भेट

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकला होता रोहन प्रीत सिंग

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लवकरच लग्न करतेय! रिपोर्ट्सनुसार येत्या 24 ऑक्टोबर रोजी ती आणि रोहन प्रीत सिंग दिल्लीत लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या लग्नसोहळ्याची आमंत्रणे पाठविली गेली आहेत, असेही सांगण्यात येत आहे. कोरोनाचा काळ लक्षात घेता नेहा आणि रोहन यांच्या लग्नात मोजकेच पाहुणे सहभागी होणार आहेत. यात दोघांचे कुटुंबातील सदस्य, निवडक नातेवाईक आणि क्लोज फ्रेंड्सचा समावेश असेल. पण नेहाने अद्याप याबाबत कोणीती अधिकृत माहिती दिलेली नाही.

काही महिन्यांपूर्वीच दोघांची भेट झाली होती

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, या दोघांच्या रिलेशनशिपला फार काळ झालेला नाही. काही महिन्यांपूर्वीच नेहा कक्करच्या 'आजा चल व्याह करवाएं, लॉकडाउन विच कत्त होने खर्चे' या गाण्याच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.

रोहन प्रीतच्या मॅनेजरने काय सांगितले?
एका पब्लिकेशनसोबत बोलताना रोहन प्रीतच्या मॅनेजरने मात्र ही गोष्ट फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, "हो, आमच्या ऐकिवातसुद्धा हे आले आहे. आतापर्यंत दोघांनी मिळून फक्त एकाच अल्बमसाठी काम केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव एकमेकांशी जोडले जात आहे. सध्या रोहन प्रीतचा लग्नाचा प्लान नाहीये."

रोहन हा एक पंजाबी गायक आहे.
रोहन हा एक पंजाबी गायक आहे.

रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकला होता रोहन प्रीत सिंग

2019 मध्ये रोहन प्रीत सिंग 'इंडियाज राइजिंग स्टार'च्या तिसर्‍या पर्वात स्पर्धक म्हणून झळकला होता. याशिवाय 'मुझे शादी करोगे' या वेडिंग रिअॅलिटी शोमध्ये देखील तो स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. 'बिग बॉस 13' ची स्पर्धक शहनाज गिलला केंद्रस्थानी ठेवून हा शो बनवण्यात आला होता.

यापूर्वी आदित्य नारायणसोबत जोडले गेले होते नेहाचे नाव
गेल्यावर्षी 'इंडियन आयडल' या सांगितिक कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायणसोबत नेहाची जोडी खूप पसंत केली गेली होती. शोच्या स्ट्रॅटेजीनुसार या दोघांच्या लग्नाची अफवा देखील पसरवण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...