आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहू-प्रीत दा व्याह:नेहा कक्कर आणि रोहन प्रीत सिंग यांच्या लग्नविधींना सुरुवात, समोर आली हळद आणि मेंदी सेरेमनीची पहिली झलक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीत दोघांचा शाही विवाहसोहळा होणार आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर लवकरच बोहल्यावर चढणार आहे. राइजिंग स्टार फेम गायक रोहन प्रीत सिंगसोबत नेहा विवाहबद्ध होणार आहे. या दोघांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून नेहाच्या हातावर मेंदी सजली आहे. नेहाच्या मेंदी सेरेमनीची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • नेहा कक्करच्या हळदीची छायाचित्रे झाली व्हायरल

लग्नाच्या काही तासांपूर्वी नेहाच्या मेंदी सेरेमनीची झलक समोर आली होती. त्यानंतर आता हळदीची छायाचित्रेदेखील व्हायरल होत आहेत. या सेरेमनीत संपूर्ण कुटुंबीय पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. नेहा पिवळ्या रंगाच्या प्लेन साडीत सुंदर दिसतेय. तर होणारा नवरदेव रोहन प्रीत सिंगनेही पिवळ्या रंगाच्या कुर्ता आणि पायजामासह पांढ-या रंगाची पगडी बांधली आहे. यावेळी सर्वजण एन्जॉय करताना दिसत आहेत.

येत्या 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीत दोघांचा शाही विवाहसोहळा होणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी नेहा तिच्या कुटुंबासह मुंबईला रवाना झाली. यावेळी तिच्यासोबत आईवडील, बहीण सोनू आणि भाऊ टोनी कक्कर यांच्यासह जवळचे नातेवाईक होते. फ्लाइटमधील फोटो शेअर करुन नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'चलो नेहू प्रीत की वेडिंग'. तर बोहल्यावर चढण्यास उत्सुक असलेल्या रोहननेदेखील 'वेडिंग हो गई शुरू', असे लिहिले होते.

नेहा आणि रोहन यांची 20 ऑक्टोबर रोजी मुंबईत रोका सेरेमनी झाली होती. यावेळी कार्यक्रमाचे व्हिडिओदेखील समोर आले होते. यात नेहा आणि रोहन भांगडा करताना दिसले होते.