आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 11 वर्षांनंतर आई झाली अभिनेत्री:नेहा मर्दाने दिला प्रीमॅच्युअर बाळाला जन्म, म्हणाली - 'मी आणि बाळ दोघीही ठीक आहोत'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बालिका वधू' या गाजलेल्या मालिकेत गेहनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मर्दा हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिने प्रीमॅच्युअर मुलीला जन्म दिला आहे. गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण झाल्याने नेहाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या तिला आणि तिच्या नवजात बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

नेहाने दिली प्रकृतीबद्दल माहिती
नेहा मर्दाला आठवडाभरापूर्वी कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता तिची प्रकृती चांगली असून तिने प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला आहे. नेहा मर्दाने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गरोदरपणात येणाऱ्या समस्यांबद्दल सांगितले होते. नेहाने सांगितल्यानुसार, "मी गरोदर राहिल्यापासून मला रक्तदाबाचा त्रास होत होता. पाचव्या महिन्यात त्रास वाढला. आमच्या डॉक्टरांनी आधीच आम्हाला याबद्दल सावध केले होते. तसेच गुंतागुंत होईल, याची कल्पनाही होती, पण सुदैवाने सर्वकाही सुरळीत झाले. मला खूप आनंद आहे की हा टप्पा संपला आहे आणि आम्ही एका सुंदर मुलीचे पालक झालो आहोत. मी आणि बाळ दोघीही ठीक आहोत," असे नेहा म्हणाली आहे.

नेहाचे बाळ प्रीमॅच्युअर असल्याने तिचे वजन खूप कमी आहे. तिला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. या आठवड्याच्या अखेरीस नेहा आणि तिच्या बाळाला रुग्णालयातून सुटी मिळणार असल्याची माहिती आहे.

लग्नाच्या 11 वर्षांनंतर आई झाली नेहा
लग्नाच्या 11 वर्षानंतर नेहा आई झाली असून हे तिचे पहिले अपत्य आहे. काही महिन्यांपूर्वी नेहाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. नेहा मर्दाने आयुष्मान अग्रवालसोबत 2012 मध्ये लग्न केले होते.

जानेवारी महिन्यात नेहाने तिच्या बेबी शॉवरचेही फोटो सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले होते. त्यासह तिने लिहिले होते, '26-01-2023 रोजी माझा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमातील प्रत्येक क्षणावर माझे प्रेम आहे. मला माहित आहे की जेव्हा बाळ या जगात येईल तेव्हा त्याच्यावर खूप प्रेम केले जाईल. आम्ही आमच्या बाळाला पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. ते संस्मरणीय बनवल्याबद्दल माझे कुटुंब आणि सर्वोत्तम मित्रांचे आभार.'

2005 मध्ये झाली नेहाच्या करिअरची सुरुवात
नेहाने 2005 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 'ऑलवेज' आणि 'घर एक सपना' या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. यानंतर नेहाने 'देवों के देव महादेव', 'डोली अरमानो की', 'लाल इश्क' आणि 'पिया अलबेला' या मालिकांमध्ये काम केले. मात्र, लग्नानंतर नेहाने अभिनयापासून दूर झाली आहे.