आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिल्म अपडेट:थिएटरनंतर OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी', तब्बल 70 कोटींना विकले गेले डिजिटल राइट्स

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचे डिजिटल अधिकार ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सला विकण्यात आले आहेत.

आगामी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबतमध्ये काम करत आहे. या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. मोठ्या पडद्यानंतर हा डिजिटल प्लेटफार्मवर रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाचे डिजिटल अधिकार ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सला विकण्यात आले आहेत. अधिकार विकत घेण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आली आहे. तब्बल 70 कोटींमध्ये या चित्रपटाचे अधिकार विकले गेले आहेत.

  • हुसैन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे चित्रपट

सध्या या चित्रपटाचे मुंबईतील फिल्मसिटी येथे चित्रीकरण सुरु आहे. शूटिंगच्या सेट डिझायनिंगवर तब्बल साडे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित या चित्रपटात डॉन गंगूबाईची कहाणी दाखवण्यात येणार आहे. गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ 500 रुपयांत विकले होते. त्यानंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले.

  • चित्रपटात अजय देवगणचा कॅमिओ

या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या सेटवर त्यांनी बरीच कामे केली आहेत. अनेक आर्किटेक्ट बोलल्यानंतर सेटला अंतिम रूप देण्यात आले. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. याशिवाय चित्रपटात शांतनु माहेश्वरी, सीमा पाहवा आणि विजय राज मुख्य भूमिकेत असतील. या चित्रपटात फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट यावर्षी दिवाळीत रिलीज होऊ शकतो.

'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाव्यतिरिक्त आलिया दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' आणि 'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या आगामी 'RRR' या चित्रपटात झळकणार आहे.