आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2021 मध्ये येणारे चित्रपट आणि वेब सिरीजचा डिटेल्ड रिपोर्ट:नेटफ्लिक्स घेऊन येत आहे 40 हिंदी सिनेमे, वेब सिरीज, माहितीपट आणि रिअ‍ॅलिटी सिरीज

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • फातिमा, नुसरत आणि माधुरीसह अनेक करतील पदार्पण

लाेकांनी लॉकडाऊनमध्ये मनोरंजनाचा मार्ग बदलला. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे, वेब सिरीज आणि माहितीपटाचे मोठे खरेदीदार आणि निर्माते उदयास आले आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स 40 भारतीय चित्रपट, वेब सिरीज, माहितीपट आणि रिअ‍ॅलिटी सिरीज घेऊन येत आहे. यात ‘धमाका’, “हसीन दिलरुबा’, ‘सरदार का ग्रँडसन’, “डीकपल्ड’, “जादुगर’, ‘पगलट’ आदी मोठे कलाकार असलेल्या प्रोजेक्टचा समावेश आहे. तर जाणून घेऊया या प्रोजेक्टविषयी....

फातिमा, नुसरत आणि माधुरीसह अनेक करतील पदार्पण
या 40 सिनेमे आणि प्रोजेक्ट्समधून अनेक मोठे कलाकार पदार्पण करतील. यात फातिमा सना शेख, नुसरत भरुचा, माधुरी दीक्षित, रविना टंडन, कार्तिक आर्यन आणि कपिल शर्माच्या नावाचा समावेश आहे. यातील काही प्रोजेक्ट आधी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होते. मात्र ते आता ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत त्यामुळे काही नकळतच ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. यातील वेब सिरीज तर काही चित्रपटात काम करताना दिसणार आहेत.

 • बुलबुल तरंग

या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कन्नौजमधील हा एक विवाह कॉमेडी सेट आहे. याचे दिग्दर्शन श्रीनारायण सिंह करणार आहेत. अरशद सईद यांनी लिहिले आहे.

 • जादूगर

यात 'शुभ मंगल ज्यादा सावधान' फेम अभिनेता जीतेंद्र कुमार आणि आरुषी शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. कथा मध्यप्रदेशातील आहे. ती एका छोट्या शहरातील जादूगराची आहे. त्याला एक फुटबॉल मॅच जिंकायची आते. कारण तो आपल्या प्रेयशीसोबत लग्न करू शकेल.

 • हसीन दिलरुबा

हा चित्रपट तयार आहे. त्याची प्रकाशन तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. यामध्ये तापसी पन्नू, विक्रांत मैसी, हर्षवर्धन राणे आणि हंसिका मोटवानी मुख्य भूमिकेत आहेत. आनंद एल राय आणि त्यांचे लेखक हिमांशू शर्मा यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली. लेखक कनिका ढिल्लन आहे.

 • अजीब दास्तान

हा धर्माटिक्सचा सिनेमा आहे ज्यात फातिमा सना शेख, जयदीप अहलावत, नुसरत भरुचा, कोंकणा सेन शर्मा, अदिती राव हैदरी आणि मानव कौलसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यात शशांक खेतान, सुमीत सक्सेना, नीरज घेवान आणि उज्मा खानने लिहिले आणि दिग्दर्शन केले आहे.

हे चित्रपट होतील प्रदर्शित

 • मिस्ट्री थ्रिलर सिनेमा 'फायंडिंग अनामिका’ मधून धक-धक गर्ल माधुरी दीक्षित वेब प्लेटफॉर्मवर पदार्पण करणार.
 • या व्यतिरिक्त कपिल शर्मादेखील ओटीटीवर प्रवेश करणार आहेत.
 • शिवाय याच वर्षी ‘देल्ही क्राइम’, ‘जामतारा’, ‘कोटा फॅक्ट्री’, ‘मसाबा मसाबा’ आणि ‘शी’ सारख्या हिट शोचे अनेक दुसरे भाग प्रदर्शित केले जातील.
 • खरं तर, ‘अरणयक’, ‘बॉम्बे बेगम्स’, ‘ये काली काली आंखें’, ‘फील्स लाइक इश्क’ सारखे प्रोजेक्ट्स असतील.
 • मणिरत्नम यांच्या निर्मितीत ‘नवरस’ नावाच्या 9 चित्रपटाची अँथोलॉजीदेखील बनत आहे. 9 वेगवेगळे निर्माते याची निर्मिती करतील.
बातम्या आणखी आहेत...