आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात नवीन खुलासा:सुशांतच्या अकाउंटमधून झाली होती पैशांची हेराफेरी, बहीण आणि भावोजीने अकाउंटंटला पकडले होते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
 व्हिडिओच्या स्क्रिनशॉटमध्ये सुशांतची बहीण प्रियांका, भावोजी सिद्धार्थ तंवर आणि अकाउंटंट रजत मेवाती दिसत आहेत. - Divya Marathi
 व्हिडिओच्या स्क्रिनशॉटमध्ये सुशांतची बहीण प्रियांका, भावोजी सिद्धार्थ तंवर आणि अकाउंटंट रजत मेवाती दिसत आहेत.
  • सुशांतच्या मृत्यूनंतर सीबीआय, ईडी, मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज (14 ऑगस्ट) दोन महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे कारण पुढे आलेले नाही. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला असून त्यात सुशांतची बहीण प्रियांका सिंह आणि भावोजी सिद्धार्थ तंवर दिसत असून हे दोघेही सुशांतच्या अकाउंटची जबाबदारी सांभाळणा-या रजत मेवातीती चौकशी करताना दिसत आहेत. सुशांतच्या अकाउंटमधून पैसे कुणाला ट्रान्सफर केले, याचा जाब विचारताना हे दोघे दिसत आहेत.

  • व्हिडिओमध्ये दोघे रजतला जाब विचारताना दिसत आहेत

हा व्हिडिओ 3 एप्रिल 2019 चा असल्याचे सांगितले जात आहे. प्रियांका आणि सिद्धार्थ रजतला वारंवार पैसे कुणाला ट्रान्सफर केले, त्याचे नाव सांग, असे विचारताना दिसत आहेत. सत्य काय ते सांग नाही तर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रियांकाने रजतला दिला. मात्र रजत काहीही न बोलता फक्त मान खाली टाकून उभा असलेला दिसतोय. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत सुशांत सिंह राजपूत कुठेही दिसला नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, पैशाच्या हेराफेरीच्या संशयावरुन रजत मेवातला काढून त्याच्या जागी सॅम्युएल मिरांडाला कामावर घेण्यात आले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडील केके सिंह यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्यांनी सॅम्युएल मिरांडावरही आरोप केले आहेत. सॅम्युएलची नियुक्ती रिया चक्रवर्तीने केली होती. तो रियासाठी काम करायचा, असा आरोप केके सिंह यांनी केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मिरांडाला कामावर ठेवण्यासाठी सुशांतची बहीण प्रियांकाने सहमती दिली होती, असे सांगितले जाते.

  • एका आठवड्यात 28 लाख रुपये काढले

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका आठवड्यात सुशांतच्या खात्यातून 28 लाख रुपये काढण्यात आले होते. त्यापैकी पाच लाख रुपये चेकद्वारे काढले गेले. तर एटीएममधून दोन लाख रुपये काढले होते. याशिवाय एटीएममधून 20-20 हजार रुपयेदेखील काढण्यात आले होते. हे पैसे 13 ते 21 नोव्हेंबर 2019 या काळात काढण्यात आले होते.

  • सुशांत ज्येष्ठांना दान द्यायचा

दुसरीकडे सुशांतच्या नोकराने खुलासा केला आहे की, तो ज्येष्ठांना दान देत असे. सुशांत नेहमी अनाथाश्रमात जायचा आणि तेथेही देणग्या द्यायचा. तो आपल्या कर्मचा-यांशी कायम चांगले वागायचा, असेही त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...