आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी 22 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. सध्या हे दोघेही त्यांच्या आगामी 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हे दोघेही त्यांच्या कमर्शिअल चित्रपट आणि पात्रांना लार्जर दॅन लाइफ देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, 'गंगूबाई काठियावाडी' मध्ये दोघांनी परस्पर संमतीने एक नवीन प्रयोग केला आहे. अजय या चित्रपटात डॉन करीम लालाच्या भूमिकेत दिसणार आहे. असे सांगितले जात आहे की, अजय आणि संजय यांनी करीम लालाचा गेटअप आणि संवाद अतिशय साधे ठेवले आहेत.
चित्रपटात करीम लालाचा उदोउदो होणार नाही, याकडे दिले लक्ष
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ आणि राजकुमार संतोषी यांच्या ‘खाकी’ या चित्रपटात अजयने यापूर्वी नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. मिलन लुथरिया यांच्या 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई'मध्ये अजयने हाजी मस्तानची भूमिका साकारली होती. तिन्ही चित्रपटांत त्याचा गेटअप लार्जर दॅन लाइफ होता. संवाददेखील वन लाइनर आणि दमदार होते. पण, 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये दोन्ही पैलू अतिशय साधे ठेवले आहेत. त्यांनी चित्रपटात करीम लालाचा उदोउदो होणार नाही, याकडे लक्ष दिले आहे.
साधे शर्ट आणि बेल बॉटम पँटमध्ये ठेवले करीम लालाचे पात्र
सेटवरील सूत्रांनी सांगितले की, "अजय आणि संजय या दोघांच्या परस्पर संमतीने हा निर्णय घेतला गेला आहे. करीम लालामध्ये लोकांना हाजी मस्तानची झलक दिसू नये, यासाठी त्यांनी हे ठरवले आहे. अजय स्वत:ला देखील असे नको होते. "दे दे प्यार दे" मध्ये जेव्हा अजयने वयाच्या पन्नाशीतील व्यक्तिची भूमिका वठवली होती, तेव्हा त्याने केस आणि दाढी पांढरी ठेवली होती. येथेही तो आपल्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक राहिला आहे. म्हणूनच साधे शर्ट आणि बेल बॉटम पँटमध्ये करीम लालाचे पात्र दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याने भन्साळींना 10 दिवसांच्या तारखा दिल्या होत्या. घाला आणि करीम लाला बेलबॉटम पॅन्ट्समध्ये कास्ट झाला आहे. चित्रपटासाठी त्याने 10 दिवसांच्या तारखा दिल्या आहेत."
'मेडे'मध्येही दिसणार आहे अजय, पाच दिवसांचे चित्रीकरण शिल्लक
अजय देवगणने 'गंगूबाई' व्यतिरिक्त संदीप केवलनी लिखित 'मेडे' जवळजवळ पूर्ण केला आहे. सूत्रांनी सांगितले की, 'आता फक्त पाच दिवसांच्या चित्रीकरणाचे काम बाकी आहे. दुबईमध्ये त्याचे चित्रीकरण करण्यात यावे अशी या कथेची मागणी आहे. यासाठी अजय देवगण फिल्म्सने दुबई सरकारची परवानगीही घेतली आहे. लसीकरणाचा प्रभाव बघितल्यानंतर संपूर्ण कास्ट आणि क्रूला दुबईला घेऊन जायचे की नाही, याचा विचार केला जाणार आहे. सध्या तर अजय देवगण गंगूबाई काठियावाडीच्या चित्रीकरणात बिझी आहेत. तसेच दुबईतील परिस्थितीवरही लक्ष ठेवले जात आहे, म्हणून 'मेडे' तांत्रिकदृष्ट्या होल्डवर आहे. दुबईमध्ये जर कोरोनाची परिस्थिती चांगली झाली नाही तर मुंबईतील एका स्टुडिओमध्ये सेट तयार करुन चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येईल."
'मेडे' मध्ये अमिताभ बच्चन प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहेत
सूत्रांनी सांगितल्यानुसार, 'मेडे'मध्ये बोमन इराणी, रकुल प्रीत सिंग, अमिताभ बच्चन, कॅरी मिनाटी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात आकांक्षा सिंह अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत. रकुल त्याच्या को-पायलटच्या भूमिकेत आहे. रकूलच्या पात्राला लव्ह अँगल आहे की हे अद्याप उघड झालेले नाही. अमिताभ बच्चन बर्याच दिवसानंतर या चित्रपटात एका प्रतिस्पर्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांची भूमिका पूर्णपणे खलनायकी नाही, पण अजयच्या मार्गात अडचणी निर्माण करणा-या व्यक्तीची त्यांची भूमिका आहे.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.