आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2020 या वर्षात अनेक बॉलिवूड कलाकरांनी नवीन घर खरेदी केले आहे. यावर्षी कोट्यवधींची संपत्ती विकत घेतलेले तारे कोण आहेत ते पाहुया-
आयुष्मान खुरानाने चंदीगडमध्ये विकत घेतले घर
'गुलाबो सीताबो' फेम अभिनेता आयुष्मान खुरानाने यावर्षी चंदिगडच्या पंचकुला येथील सेक्टर 6 मध्ये आपल्या कुटुंबासाठी घर विकत घेतले आहे. त्याच्या या घराची किंमत सुमारे 9 कोटी आहे. या घरात आयुष्मानसह त्याची पत्नी ताहिरा, आई-वडील आणि त्याचा भाऊ अपारशक्ति खुरानाचे कुटुंब एकाच छताखाली राहणार आहेत.
अर्शद वारसीने गोव्यात खरेदी केला व्हिला
अभिनेता अर्शद वारसी यावर्षी आपल्या नवीन व्हिलासाठी चर्चेत आहे. असुर या हिट वेब सीरिजमध्ये झळकलेल्या अर्शद वारसीने लॉकडाऊनच्या काही दिवसांपूर्वीच गोव्यातील प्राइम लोकेशनमध्ये लक्झरी व्हिला विकत घेतला आहे. हा शानदार व्हिला 1875 ची हेरिजेट प्रॉपर्टी आहे.
यामी गौतमने डुप्लेक्स विकत घेतला
या वर्षाच्या सुरूवातीस, 'बाला' फेम अभिनेत्री यामी गौतमने मुंबईत डुप्लेक्स खरेदी केला. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, या डुप्लेक्स व्यतिरिक्त यामीने 2016 मध्ये 100 वर्षे जुने एक फार्म हाऊस खरेदी केले होते. हे फार्म हाऊस 25 एकरचे आहे. तिची ही मालमत्ता हिमाचल प्रदेशात आहे.
विक्रांत मैसीने मुंबईत घर विकत घेतले
मिर्जापूरमध्ये बबलूच्या भूमिकेत दिसलेल्या विक्रांत मैसीने गर्लफ्रेंड शीतलसोबत साखरपुडा केला. याशिवाय त्याने दिवाळीत मुंबईत एक नवीन घर देखील खरेदी केले. विक्रांतने सोशल मीडियावरुन ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. सध्या त्याच्या घराच्या इंटेरियरचे काम सुरु असून अद्याप विक्रांत तेथे शिफ्ट झालेला नाही.
आलिया भट्टने खरेदी केले एक आलिशान अपार्टमेंट
हिंदुस्तान टाईम्सच्या नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, सडक 2 फेम अभिनेत्री आलिया भट्टने वांद्रेच्या वास्तु पाली हिल कॉम्प्लेक्समध्ये 2460 चौरस फूट अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत सुमारे 32 कोटी आहे. रणबीर कपूर देखील वांद्रेमध्ये याच इमारतीत राहतो. गौरी खानने आलियाच्या नवीन घराचे इंटेरियरचे काम केले आहे. याशिवाय आलियाने जुहू आणि लंडनमध्येही घरे खरेदी केली आहेत.
हृतिक रोशनने दोन घरं खरेदी केली
जुहूमधील सी फेसिंग अपार्टमेंटनंतर यावर्षी हृतिक रोशनने दोन नवीन घरे खरेदी केली. जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील मन्नत बिल्डिंगच्या 14, 15 आणि 16 मजल्यावर ही दोन्ही घरे आहेत. ही घरे 38,००० चौरस फुटांवर बांधली गेली आहेत, ज्याची किंमत सुमारे 100 कोटी आहे. त्यातील एक डुप्लेक्स आणि दुसरे पेंटहाउस आहे, येथून अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दिसते. लवकरच हृतिक या दोन्ही घरांचे एका मोठ्या मेंशनमध्ये रुपांतर करणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.