आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन प्रवास:रुपेरी पडद्यावर अजय देवगणच्या मुलीची भूमिका वठवणा-या इशिता दत्ताने लाँच केला स्वतःचा फॅशन ब्रॅण्ड, ग्लॅमरस अंदाजात केले फोटोशूट

किरण जैन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इशिताने लाँच केला कपड्यांचा ब्रॅण्ड

'दृश्यम' या चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता हिने स्वतःचा फॅशन ब्रँड लाँच केला आहे. तिने सांगितल्यानुसार, लॉकडाउनमुळे अभिनयाव्यतिरिक्त पैसे कमावण्यासाठी दुसरे माध्यम असणे किती महत्त्वाचे आहे, याचे महत्त्व समजले आहे. इशिताने नुकताच एका क्लोदिंग ब्रॅण्डच्या सहकार्याने स्वत:चा फॅशन ब्रॅण्ड सुरू केला आहे. दैनिक भास्करशी झालेल्या बातचीत दरम्यान इशिताने तिच्या ब्रॅण्डविषयी सांगितले. संभाषणादरम्यान तिने पती वत्सल सेठच्या फॅशन सेन्सचाही उल्लेख केला.

इशिताने लाँच केला कपड्यांचा ब्रॅण्ड
इशिता सांगत, "फक्त कलाकारच नव्हे तर इंडस्ट्रीत कॅमे-या मागे असलेले लोकदेखील स्वतःला या क्षेत्रात सुरक्षित समजत नाहीत. आमच्या इंडस्ट्रीत खूप अनियमितता आहे. एक वेळ अशी होती की, कामाच्या व्यापामुळे मी वत्सलला भेटू शकत नव्हती आणि नंतर एक वेळ अशी आली की, हातात काहीच काम नव्हते. मी या मोकळ्या वेळेचे संधीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मी अभिनयाबरोबरच स्वतःचा कपड्यांचा ब्रॅण्ड सुरू करण्याचा विचार केला. पैशांसोबतच निवडीची बाब देखील आहे. वत्सलला मुले खूप आवडतात आणि म्हणूनच त्याने मुलांच्या शाळेसोबतही टायअप केले आहे.'

इशिताने केले ग्लॅमरस फोटोशूट
इशिताने नुकतेच तिच्या ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. याबद्दल ती सांगते, "फोटोशूट्स करायला खूप मजा येते, वेगवेगळ्या स्टाईलिंग करायला लागतात. जेव्हा आपण एखाद्या फिल्म किंवा टीव्ही शोचा भाग असता तेव्हा आपल्याला एका लुकमध्ये राहण्याची संधी मिळते पण फोटोशूटमध्ये असे होत नाही. या फोटोशूटची थीम ही पार्टी होती ज्यासाठी मी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला आहे."

इशिताने नव-याच्या आवडीनिवडीविषयी सांगितले
वत्सलच्या फॅशन निवडीबद्दल इशिता सांगते, "खरेदी करताना वत्सलच्या निवडीची खूप काळजी घ्यावी लागते. जर त्याला काही आवडत नसेल तर तो लगेचच बोलतो. वत्सलचा स्टाईल सेन्स खूप वेगळा आहे आणि म्हणूनच मी त्याच्यासाठी काहीही विकत घेऊ शकत नाही. वत्सलला वेगवेगळ्या रंगांचा प्रयोग करायला आवडतं."

फोटो : अजीत रेडेकर

बातम्या आणखी आहेत...