आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपनाचा नवा अंदाज:आई झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्लॅमरस अंदाजात दिसली सपना चौधरी, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबर महिन्यात सपनाने मुलाला जन्म दिला.

हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि 'बिग बॉस 11' ची माजी स्पर्धक सपना चौधरी आई झाल्यानंतर पुन्हा एकदा एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत अॅक्टिव झाली आहे. आई झाल्यानंतर सपनाने आपले वाढलेले वजन कमी केले असून ती पुर्वीच्या रुपात परतली आहे. अलीकडेच तिने एक फोटोशूटही केले आहे ज्यात तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोशूटमध्ये सपना व्हाइट पेंटसूटमध्ये पोज करताना दिसत आहे. तिने आपल्या ओठांवर बोल्ड मेटलिक ब्लू लिपस्टिक आणि डोळ्यावर पांढरे आईलाइनर लावले आहे. दोन हेअर बन्ससह सपनाने आपला हा लूक पूर्ण केला आहे. या लूकबद्दल आपल्या टीमचे आभार मानत सपनाने फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या टीमला टॅग करताना तिने लिहिले, "क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट आणि स्टायलिंगसाठी धन्यवाद."

सपनाने गुपचुप केले होते लग्न

यापूर्वी सपनाने इन्स्टाग्रामवर पती वीर साहूबरोबर करवाचौथ साजरा करतानाचे फोटो शेअर केले होते, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलाच्या जन्मानंतर वीर साहू यांनी सपना आणि त्यांच्या लग्नाचा खुलासा केला होता. जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी यावर्षी जानेवारीत लग्न केले होते.

त्याचबरोबर, गरोदर राहिल्याच्या बातमीवरून सपनाला ट्रोल करणा-यांना खडे बोल सुनावत आपल्या लग्नाविषयी वीर साहू म्हणाले होते, 'आम्ही दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न केले आहे. सपनाच्या संघर्षाचा मी आदर करतो आणि तिच्या कामात हस्तक्षेप करत नाही. आपले अपूर्ण राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी ती लवकरच कमबॅक करेल', असेही ते म्हणाले. सोबतच सोशल मीडियावर ट्रोल करणा-यांना महिला आणि कलाकारांचा आदर करण्याचा सल्लादेखील वीर साहू यांनी दिला होता.

बिग बॉस 11 मुळे घराघरात पोहोचली सपना
सपना चौधरीची आई नीलम यांनीही एका मीडिया हाऊसशी बोलताना सपना आणि बाळाची तब्येत उत्तम असल्याचे सांगितले. बिग बॉस 11 मध्ये भाग घेतल्यानंतर सपना चौधरी देशभरात खूप प्रसिद्ध झाली होती. लॉकडाऊन दरम्यानही ती तिच्या चाहत्यांचे इंस्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजन करत होती. तर सपनाचे पती वीर साहू हेदेखील हरियाणातील प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक चित्रपट आणि व्हिडिओजमध्ये काम केले आहे.

सपनाचे अनेक व्हिडिओ गाजले

सपनाच्या बर्‍याच डान्स व्हिडिओंनी इंटरनेट धूम केली आहे. 'तेरी अंखियां का यो काजल', 'सॉलिड बॉडी', 'छोरी भैंस बडी बिंदास' ही तिची सर्वात लोकप्रिय गाणी आहेत. याशिवाय 'वीरे की वेडिंग' चित्रपटातील 'हट जा ताऊ' या डान्स नंबरद्वारे तिने बॉलिवूडमध्येही डेब्यू केला होता. यानंतर, ती अभय देओल स्टारर फिल्म 'नानू की जानू' मधील 'लव बाइट' आणि 'तेरे ठुमके सपना चौधरी' या गाण्यांमध्येही झळकली होती.

बातम्या आणखी आहेत...