आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • New Twist In Sushant Case: Revealed In Call Date Riya Called Sushant From Chandigarh To Mumbai After Making 25 Calls In Five Days, Wanted To Get Admitted In Mental Asylum

सुशांत प्रकरणाला नवीन वळण:कॉल डिटेलमध्ये खुलासा - 5 दिवसांत 25 कॉल करुन रियाने सुशांतला चंदीगढहून मुंबईला बोलावले होते, मेंटल हॉस्पिटलमध्ये करणार होती दाखल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत आणि रिया यांच्यातील कॉल डिटेलच्या तपासणीतून याचा खुलासा झाला आहे.
  • आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करणार आहे, तर दुसरीकडे ईडीने रियालाही समन्स बजावले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दररोज या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार, या प्रकरणात फसवणुकीच्या आरोपांना सामोरे जाणा-या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल समोर आले आहेत. सोबतच सुशांतला आजारपणाची भीती दाखवून रिया त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करणार होती, असा धक्कादायक खुलासा झाला आहे.

यावर्षी जानेवारीत सुशांत 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान कारने चंदीगढला गेला होता हेही समोर आले आहे. त्याला आपल्या बहिणीबरोबर राहायचे होते. या पाच दिवसांत रियाने त्याला 25 फोन केले होते.

  • सुशांतला हिमाचलला जायचे होते

सुशांतला आपल्या बहिणींसोबत चंदीगढ आणि नंतर हिमाचलला जायचे होते. मात्र, रियाने त्याला ब्लॅकमेल करून रोखले. सुशांतने आपल्या बहिणींना रिया आणि तिच्या कुटूंबाविषयी सांगितले होते. सुशांतला मुंबई सोडून हिमाचल प्रदेशात कोठेतरी राहायचे होते, हेही समोर आले आहे.

  • सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करणार होती रिया

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नवीन नंबरवरुन बहिणीला मदत मागण्यासाठी फोन केला होता. सुशांतने म्हटले होते की, रिया आणि तिचे कुटुंबीय त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याला रुग्णालयात जाण्याची इच्छा नाही.

  • सुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर केले गंभीर आरोप

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप आहेत. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. रियाचा सुशांतच्या पैशांवर डोळा होता आणि तिने त्याच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला, असे सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सीबीआय या प्रकरणात चौकशी सुरू करणार आहे. त्याचबरोबर ईडीने रियालाही समन्स बजावले आहे.

बातम्या आणखी आहेत...