आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅक टू वर्क:मुलगी वामिकाच्या जन्मानंतर ठरलेल्या वेळेआधी कामावर परतली अनुष्का शर्मा, लागोपाठ शूटिंग करणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्काने स्वतः मेकअप रुममधील एक फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्माने यावर्षी 11 जानेवारी रोजी मुलगी वामिकाला दिला. आई झाल्यानंतर दोन महिन्यांतच ती पुन्हा कामावर परतली आहे. यापूर्वी ती कोणत्याही प्रोजेक्टचे शूटिंग मे महिन्यापासून सुरू करेन असे बोलले जात होते, परंतु अचानक तिने तिच्या वेळापत्रकाच्या दोन महिन्यांपूर्वी एका जाहिरातीच्या शूटिंगचे काम सुरू केले. शूटदरम्यान ती एकदम फिट दिसत होती.

सेटशी संबंधित एका सूत्राने सांगितले, ‘अनुष्का पूर्वीइतकीच तंदुरुस्त दिसत आहे. आईची पूर्ण जबाबदारी स्वीकारत ती आपल्या कामाचे आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन साधण्यास तयार आहे. तिच्या कॉल-टाइमपूर्वी ती शूटच्या आधीच सेटवर होती.' खरं तर अनुष्का पुढील काही दिवस सर्व प्रीमियम ब्रँडसाठी बॅक-टू-बॅक जाहिरातींचे शूटिंग करणार आहे.

अनुष्कानेदेखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मेकअप रुमचा एक फोटो शेअर केला आहे. यात ती स्क्रिप्ट वाचत आहे तर सोबत मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्टही दिसत आहेत.

अनुष्काचे सेटवरचेही काही फोटोज व्हायरल होत आहेत.

अखेरची 'झिरो'मध्ये झळकली होती अनुष्का
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे दोन वर्षांपूर्वी तिचा 'झीरो' चित्रपट आला होता. यात तिच्यासह शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. निर्माती म्हणून अनुष्काची 'पाताल लोक' ही वेब सीरिज बरीच गाजली होती. याशिवाय तिने 'बुलबुल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट 24 जून 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

बातम्या आणखी आहेत...