आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा परिणाम:‘भेडिया’चे चित्रीकरण रखडल्याने ‘स्त्री 2’च्या पटकथेकडे वळली दिनेश विजान आणि अमर कौशिकची टीम

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाच्या दुस-या भागात दिसतील पहिल्याच भागातील कलाकार

कोेरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटांचे चित्रीकरण बंद असले तरी न थांबता त्यांचे लेखन सुरू आहे. वेगाने चित्रपट निर्मिती करणारे दिनेश विजानदेखील त्यांच्या काही आगामी चित्रपटांच्या कामाला लागले आहेत. नुकतेच त्यांचा चित्रपट ‘भेडिया’चे पहिले शेड्यूल पूर्ण झाले. मात्र या चित्रपटाचे पुढचे शेड्यूल निश्चित नाही. यामुळे त्यांची टीम आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या टीमने चित्रपट “स्त्री 2’ च्या पटकथेवर काम पुन्हा सुरू केले आहे. मॅडॉक फिल्मशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, या चित्रपटाची पटकथा आणखी रंजक करण्यासाठी त्यात बदल केले जात आहेत.

  • 'स्त्री 2’ मध्ये नसणार वरुण

अधिकृत सूत्रांनुसार त्यातील मूळ कलाकारात कोणताही बदल केला जाणार नाही. सिक्वेलमध्येही राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी असतील. मात्र, ट्रेड सर्कलमध्ये म्हटले जात आहे की, यासाठी वरुण धवन आणि आलिया भट्टला आणले जाऊ शकते. मात्र मॅडॉक फिल्म्सच्या अधिकाऱ्यांनी या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. याची शक्यता कमी असल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे.

  • यंदा किंवा पुढच्या वर्षापर्यंत होईल सुरुवात - अभिषेक

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बॅनर्जीही याबाबत बोलला होता. त्याने सांगितले होते, या चित्रपटाचा पुढचा भाग तयार होणार आहे. काहीतरी काम सुरू झाल्याचे मीदेखील ऐकले आहे. मात्र सध्या जी स्थिती आहे त्यात नक्की काहीच नाही. या स्थितीमुळे प्रोजेक्टला उशीर होत आहे. अन्यथा 'स्त्री 2’ खूप आधीच सुरू झाला असता. यंदा किंवा पुढच्या वर्षापर्यंत सुरू होईल अशी आशा आहे.

यामुळे बदलणार नाहीत कलाकार

  • यशस्वी पात्रांमुळे कलाकार बदल करण्याची शक्यता नाही.
  • चित्रपटाचा पुढचा भाग तसाही सीक्वल असणार आहे. त्याला फ्रँचायझीमध्ये बदलले जाणार नाही.
  • वेगवेगळी कथा असती तर पात्रात बदल करण्याची शक्यता होती. मात्र ते तसे नाही.
  • दुसऱ्या भागाची कथा पहिल्या भागाच्या शेवटापासून सुरू होईल. यामुळे पहिल्या भागातील पात्रांसोबतच ती पुढे नेली जाईल.
बातम्या आणखी आहेत...