आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागडी भेट:प्रियांका चोप्राचा वाढदिवस पती निक जोनासने बनवला सुपर स्पेशल, गिफ्ट म्हणून दिली तब्बल 13 लाखांची वाईनची बाटली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1982 शेटो मुटेन रोथशील्ड बाटली पाठविली

अभिनेत्री प्रियांका चोप्राला तिच्या वाढदिवशी ब-याच महागड्या भेटवस्तू मिळाल्या असतील, पण तिचा नवरा निक जोनासने तिच्यासाठी पाठवलेले गिफ्ट सर्व भेटवस्तूंच्या वरचढ ठरले आहे. 39 व्या वाढदिवशी प्रियांकाला तिच्या पतीकडून रेड वाईनची एक महागडी बाटली मिळाली. विशेष म्हणजे या बाटलीच्या किंमतीत भारतात 1 बीएचके घर विकत घेतले जाऊ शकते.

1982 शेटो मुटेन रोथशील्ड बाटली पाठविली
निकने अमेरिकेहून 1982च्या शेटो मुटेन रोथशील्डची बाटली प्रियांका चोप्राला पाठविली आहे. प्रियांकाने या गिफ्टचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. फोटोमध्ये एका टेबलावर वाईनचा मोठा ग्लासदेखील दिसतोय, पांढरी फुले, मेणबत्त्या आणि टॉय वाइनच्या छोट्या छोट्या बाटल्यांनी टेबल सजवलेला फोटोत दिसतोय. हा फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले, 'लव्ह यू निक.'

म्हणूनच निकची भेट मौल्यवान आहे
फ्रान्सच्या बोर्डोच्या उत्तर-पश्चिम भागात बनवण्यात येणारे हे एक दुर्मिळ वाइन आहे. 10,000 ते 13,000 ब्रिटिश पाउंडमध्ये या वाईनची किंमत असते. भारतीय चलनात सुमारे 10 ते 13 लाख रुपये ही किंमत आहे. एवढेच नव्हे तर वाईनची बाटली सामान्यत: लिलावात मिळते आणि कदाचितच रिटेल सेलमध्ये ती उपलब्ध असते.

बातम्या आणखी आहेत...