आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वर्षाच्या सुरुवातीला सरोगसीद्वारे एका मुलीचे आईवडील झाले आहे. वृत्तानुसार, आता हे कपल दुस-या बाळाची तयारी करत आहे. प्रियांका आणि निक दोघांनाही त्यांच्या आयुष्यात भावंडांचे महत्त्व समजले आहे, त्यामुळे त्यांची मुलगी मालती मेरीला भावंडांची कमतरता भासू नये अशी त्यांची इच्छा आहे.
प्रियांका-निकला मुलीसाठी हवे आहेत भावंड
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, प्रियांका आणि निकच्या मते भाऊ-बहिणीचे प्रेम खूप महत्वाचे आहे, त्यामुळे त्यांना मालतीसाठीही तेच हवे आहे. हे जोडपे लवकरच दुसऱ्या बाळाचा विचार करतील. दुसरे बाळही मालतीप्रमाणे सरोगसीच्या माध्यमातून जन्माला येईल.
या कपलला त्यांच्या मुलांच्या वयात जास्त अंतर नकोय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकला त्याच्या मुलांच्या वयात जास्त अंतर नकोय. तसेच, निकची इच्छा आहे की त्याच्या आणि त्याचे भाऊ केविन जोनास आणि जो जोनास यांच्या मुलांच्या वयात जास्त अंतर नसावे. रिपोर्ट्सनुसार, जोनास ब्रदर्सना त्यांची मुले चुलत भाऊ म्हणून नव्हे तर भावंड म्हणून हवी आहेत.
6 महिन्यांची झाली प्रियांका-निकची मुलगी मालती
प्रियांका आणि निक यांनी नुकताच त्यांची मुलगी मालती मेरी हिचा 6 व्या महिन्याचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. मात्र, अद्याप निक आणि प्रियांकाने त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही.
प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट्स
प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच 'सिटाडेल'मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे फरहान अख्तरचा 'जी ले जरा' हा चित्रपटही आहे. या चित्रपटात प्रियांकाशिवाय आलिया भट्ट आणि कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय 'मॅट्रिक्स 4', 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' आणि 'एन्डिंग थिंग्ज' असे बरेच प्रोजेक्ट्स प्रियांकाच्या हातात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.