आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीला चोरट्यांनी लुटले:शूटिंगसाठी दिल्लीला गेली होती निकिता रावल, चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत लुटले 7 लाख रुपये

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निकिताने स्वतःला कपाटात कोंडून घेतले होते

अभिनेत्री निकिता रावलसोबत अलीकडेच एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील शास्त्री नगर परिसरात काही गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत निकिताजवळील सुमारे सात लाख रुपये किंमतीच्या वस्तू लुटल्या आहेत. निकिता एका शूटिंगच्या निमित्ताने दिल्लीत तिच्या मावशीच्या घरी थांबली होती. घटनेच्या वेळी ती घरात एकटी होती. निकिताने सांगितल्यानुसार, ती चोरट्यांचा चेहरा बघू शकली नाही, कारण त्यांनी चेह-यावर मास्क घातला होता. चार गुंडांनी निकिताचे अपहरण करून तिच्याकडील वस्तू चोरल्या. या घटनेनंतर निकिता लगेचच दिल्लीहून मुंबईला परतली.

स्वतःला कपाटात कोंडून घेतले होते
एका मुलाखतीत निकिताने तिच्यासोबत घडलेली घटना कथन केली आहे. निकिता म्हणाली, 'रात्री जवळपास 10 वाजताची वेळ असेल. मी माझ्या मावशीच्या घरीहोते. तेव्हा 4 मास्क घातलेल्या लोकांनी बंदूकीचा धाक दाखवत माझ्याकडील सर्व वस्तू चोरल्या. या घटनेबद्दल बोलताना मला अजूनही भिती वाटतेय.” या चोरांनी निकिताकडील अंगठी, घड्याळ, कानातले, हिऱ्याचं पेंडेंट आणि काही रोख रक्कम चोरली. या संपूर्ण वस्तूंची किंमत जवळपास सात लाख रुपये असल्याचे निकिताने सांगितले.

पुढे निकिता म्हणाली, 'त्यावेळी मला वाटले होते हे लोक मला जीवे मारतील. त्याहून जास्त भिती होती ती म्हणजे चोरी केल्यानंतर यांनी माझा बलात्कार केला तर.. त्या दहा मिनिटांत मी कोणत्या स्थितीचा सामना केला हे शब्दात मांडणे देखील कठिण आहे. या घटनेनंतर मी स्वतःला कपाटात कोंडून घेतले होते.'

'मी अद्याप या ट्रॉमातून बाहेर आलेली नाही. मी जिवंत आहे, यावरच माझा विश्वास बसत नाहीये, मी त्यांना तोंड दिले नसते, तर कदाचित मी मेले असते,' असे निकिताने सांगितले.

कोण आहे निकिता रावल?
निकिता मुंबईत वास्तव्याला आहे. 2007 मध्ये निकिताने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 2007 मध्ये ‘मिस्टर हॉट मिस्टर कूल’ आणि 2009 मध्ये ‘द हिरो अभिमन्यू’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच निकिता लवकरच ‘रोटी कपडा और रोमान्स’ मध्ये अर्शद वारसी आणि चंकी पांडे सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 2019 मध्ये किने इनोसेंट वायरस नावाच्या एका चित्रपटात अभिनय केला होता. ती एक उत्कृष्ट नृत्यांगणा देखील आहे. निकिता आस्था फाऊंडेशन नावाचे एक एनजीओ चालवते. मागील वर्षी कोरोना काळात तिने अनेकांची मदतदेखील केली होती.

बातम्या आणखी आहेत...