आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई डायरीज 26/11:शोला मिळत असलेला प्रतिसाद बघून निखिल आडवाणी म्हणतात, 'प्रत्येकाच्या प्रयत्नाला मिळणारे यश पाहणे खूप चांगले वाटतेय'

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा शो 9 सप्टेंबरपासून प्राईम व्हिडिओवर जगभरातील 240 देशातील प्राईम सदस्यांसाठी उपलब्ध आहे.

'मुंबई डायरीज 26/11' प्रदर्शित झाली असून अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या या वेब सीरिजला समीक्षकांसह प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनयापासून पटकथा आणि दिग्दर्शनापर्यंत सर्वच बाबी उत्तम असून जमून आल्या असून दिग्दर्शक निखिल आडवाणी यांनी नुकत्याच याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

निखिल आडवाणी म्हणाले की, "मुंबई डायरीज़ 26/11 ला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे आम्ही सर्वच जण खूप आनंदित झालो आहोत. आमच्या सर्वांच्याच प्रयत्नांचे दर्शकांकडून कौतुक होताना पाहणे चांगले आहे, खासकरून तेव्हा, जेव्हा सांगितली गेलेली गोष्ट तुमच्या मनाच्या खूप जवळ असते. दर्शक प्रत्येक बाजूने कौतुकाचे सुंदर संदेश पाठवत आहेत आणि या तऱ्हेच्या अभूतपूर्व प्रतिक्रिया मिळणे, हा खूपच सुखद अनुभव आहे. त्यांच्या या प्रतिक्रियांनी शोला मस्ट-वॉच बनवले आहे आणि मी याबाबत कृतज्ञ आहे."

हा शो 9 सप्टेंबरपासून प्राईम व्हिडिओवर जगभरातील 240 देशातील प्राईम सदस्यांसाठी खास करून उपलब्ध आहे.

एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस सहदिग्दर्शित ‘मुंबई डायरीज 26/11’ ही सीरिज डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या दहशतावादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांची अप्रकाशित कथा सादर करते.

या सीरिजमध्ये कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान गुणी कलाकार आहेत.

मुंबई डायरीज 26/11 एक काल्पनिक मेडिकल ड्रामा असून त्या भयानक, अविस्मरणीय रात्रीच्या पार्श्वभूमीवर आहे, ज्याने एका बाजूला शहराला नष्ट केले, मात्र दुसऱ्या बाजूला लोकांची एकजुट केली आणि कोणत्याही संकटाचा एकजुटीने सामना करण्याच्या भावनेला प्रबळ केले.

बातम्या आणखी आहेत...