आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील सर्वात श्रीमंत घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबानी कुटुंबासाठी शुक्रवारची रात्र खूप खास होती. नीता अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा ग्रँड ओपनिंग सोहळा रंगला. या सोहळ्याला बॉलिवूड, राजकारणापासून क्रिडा, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. या ओपनिंग सोहळ्यापूर्वी नीता अंबानींनी या सेंटरमध्ये पूजाअर्चा केली. त्यानंतर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात स्वतः नीता अंबानी यांनी सादरीकरण केले.
रघुपती राघव राजा राम भजनावर केले सादरीकरण
नीता अंबानींच्या डान्स परफॉर्मन्सचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत नीता NMACC इव्हेंटमध्ये भरतनाट्यम सादरीकरण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ NMACC इंडियाच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नीता अंबानी रेड कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. यासह त्यांनी हेवी ज्वेलरी घातली आहे. श्रेया घोषालच्या आवाजात स्वरबद्ध असलेल्या रघुपती राघव राजाराम या भजनवर नीता अंबानींनी भरतनाट्यम सादर केले. त्यांचा हा परफॉर्मन्स लक्ष वेधून घेणारा आहे.
वयाच्या सहाव्या वर्षापासून भरतनाट्यम करत आहेत नीता अंबानी
नीता अंबानी यांना बालपणापासून नृत्याची आवड आहे. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून भरतनाट्यम सुरू केले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "वयाच्या सहाव्या वर्षापासून भरतनाट्यम प्रवासाला सुरुवात करणाऱ्या नीता अंबानी एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहेत. 'द ग्रेट इंडियन म्युझिकल: सिव्हिलायझेशन टू नेशन' मधील त्यांचा हा खास परफॉर्मन्स केवळ भव्य लाँचसाठी कोरिओग्राफ करण्यात आला आहे."
NMACC हा नीता अंबानींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर अर्थातच NMACC मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आहे. नीता अंबानींचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याद्वारे भारतीय कलाप्रकारांचे जतन आणि संवर्धन करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.