आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाल म्हणजेच 31 मार्च रोजी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) चे भव्य उद्घाटन झाले. बॉलिवूडपासून ते धार्मिक गुरू, क्रीडा आणि व्यावसायिक जगतात अनेक दिग्गज NMACC च्या लाँचिंगला उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राही तिच्या कुटुंबासह भारतात आली होती. या कार्यक्रमाला दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, सोनम कपूर, कियारा अडवाणी- सिद्धार्थ मल्होत्रा, सचिन तेंडुलकर, सलमान खान, अनुष्का दांडेकर, नीतू कपूर, अनंत अंबानी, श्लोका अंबानी, नीता अंबानी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
हॉलिवूड सेलिब्रिटींचीही हजेरी
एम्मा चेंबरलेन, गिगी हदीद यांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॉडेल्सही या कार्यक्रमात दिसल्या. याशिवाय देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, स्मृती इराणी यांसह अनेक राजकारणीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
देशातील सर्वात मोठे सांस्कृतिक केंद्र बनणार
मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर सुरू झाले आहे. हे सांस्कृतिक केंद्र हायटेक सुविधांनी सुसज्ज आहे. यात डायमंड बॉक्स, स्टुडिओ थिएटर, आर्ट हाऊस आणि पब्लिक आर्ट अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्यासाठी हे खास सांस्कृतिक केंद्र तयार करण्यात आले आहे. केंद्रामध्ये 2,000 आसनांचे ग्रँड थिएटर, तांत्रिकदृष्ट्या विकसित 250-आसनांचा स्टुडिओ आणि 125-आसनांचा क्यूब, तसेच चार मजल्यांचे आर्ट हाउस आहे.
या कार्यक्रमात काय म्हणाल्या नीता अंबानी?
या कार्यक्रमात मुकेश अंबानी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी NMACC च्या लाँचिंगवेळी म्हणाल्या, 'सांस्कृतिक केंद्राला मिळणारा पाठिंबा पाहून मी भारावून गेले आहे. हे जगातील सर्वोत्तम सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. सर्व कला आणि कलाकारांचे येथे स्वागत आहे. येथे छोट्या शहरातील तरुणांनाही त्यांची कला दाखवण्याची संधी मिळणार आहे. मला आशा आहे की जगातील सर्वोत्तम शो येथे येतील.'
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश
मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना केंद्रात मोफत प्रवेश मिळेल. अन्य लोक नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर - nmacc.com किंवा BookMyShow च्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करू शकतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.