आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी कल्चरल इव्हेंटचे खास क्षण:एकाच फ्रेममध्ये दिसले ऐश्वर्या आणि सलमान, गिगी हदीदने शेअर केले शाहरुखसोबतचे फोटो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत मागील तीन दिवस नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा कार्यक्रम रंगला. रविवार 2 एप्रिल हा कार्यक्रमाचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता. दरम्यान, या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या दिवसांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत असून ते लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हॉलिवूड अभिनेता टॉम हॉलंडसोबतचे शाहरुख आणि सलमानचे फोटो असो किंवा आराध्या बच्चन आणि रेखाचे यांचे फोटो असो, सर्वच लक्ष वेधणारे आहेत.

कार्यक्रमादरम्यान, असे अनेक इनसाइड मोमेंट्स आहेत, ज्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूया NMACC इव्हेंटचे खास फोटो-

या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्टार्सनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्टार्सनी हजेरी लावली होती.

स्पायडरमॅन कलाकारांसोबत दिसले शाहरुख आणि सलमान
सोशल मीडियावर एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख आणि सलमान कार्यक्रमादरम्यान टॉम हॉलंड, झेंडाया आणि नीता अंबानी यांच्यासोबत पोज देताना दिसत आहेत. तसेच, विशेष बाब म्हणजे या फोटोमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन यांचीही झलक दिसत आहे. मात्र, दोघीही या सेलिब्रिटींसोबत फोटो काढत नाहीयेत. तर त्या या फ्रेममध्ये दिसत आहेत.

ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्यासोबत या फ्रेममध्ये दिसत आहे.
ऐश्वर्या राय तिची मुलगी आराध्यासोबत या फ्रेममध्ये दिसत आहे.

रेखा यांनी अमिताभ यांच्या नातीचे केले लाड
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या दिग्गज अभिनेत्री रेखासोबत दिसत आहेत. फोटोंमध्ये रेखा आराध्याला मिठी मारताना दिसत आहेत. नेटकरी या पोस्टवर कमेंट करत आहेत. रेखा यांचा नेटकऱ्यांनी आराध्याची आजी असा उल्लेख केला आहेत.

मनीष मल्होत्रासोबत ऐश्वर्या, आराध्या आणि रेखा
मनीष मल्होत्रासोबत ऐश्वर्या, आराध्या आणि रेखा
पहिल्यांदाच आराध्या रेखा यांच्यासोबत दिसली.
पहिल्यांदाच आराध्या रेखा यांच्यासोबत दिसली.

टॉम हॉलंडने मानले अंबानी कुटुंबाचे आभार
स्पायडर-मॅन फेम अभिनेता टॉमचा फोटो चर्चेत आहे, ज्यामध्ये टॉम मुकेश अंबानींसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे. हा फोटो टॉमने स्वतः त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. ही पोस्ट समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर बरेच मीम्स तयार केले.

मुकेश अंबानींशी हस्तांदोलन करताना टॉम हॉलंड
मुकेश अंबानींशी हस्तांदोलन करताना टॉम हॉलंड

गिगीने शाहरुख आणि ऐश्वर्यासोबतचा फोटो शेअर केला
सुपरमॉडेल गिगी हदीदने तिच्या सोशल मीडिया हँडलवर कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर करून अंबानी कुटुंबाचे आभार मानले आहेत. यातील काही फोटोमध्ये ती ऐश्वर्या, आराध्या बच्चन आणि शाहरुखसोबत दिसत आहे. याशिवाय गिगीने एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती झेंडाया, टॉम हॉलंड, लॉ रोच आणि पेनेलोप क्रूझसोबत दिसत आहे.

या कार्यक्रमातील गिगी हदीदची गोल्डन आणि व्हाइट साडी चर्चेत होती.
या कार्यक्रमातील गिगी हदीदची गोल्डन आणि व्हाइट साडी चर्चेत होती.
कार्यक्रमाच्या दोन्ही दिवशी शाहरुख खानने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.
कार्यक्रमाच्या दोन्ही दिवशी शाहरुख खानने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.
या इव्हेंटमध्ये ऐश्वर्या ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. तर आराध्याने पेस्टल कलरचा आउटफिट कॅरी केला होता.
या इव्हेंटमध्ये ऐश्वर्या ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. तर आराध्याने पेस्टल कलरचा आउटफिट कॅरी केला होता.
झेंडाया, पेनेलोपे, गीगी हदीद, टॉम हॉलंड आणि लॉ रोच
झेंडाया, पेनेलोपे, गीगी हदीद, टॉम हॉलंड आणि लॉ रोच

कुटुंबासह शाहरुख खान
कार्यक्रमादरम्यान शाहरुख कुटुंबासोबत मीडियासमोर दिसला नाही. परंतु या कार्यक्रमातील एक इनसाइड फोटो समोर आला आहे. ज्यात शाहरुख सुहाना, आर्यन आणि गौरीसोबत दिसतोय.

शुक्रवारी रात्रीच्या कार्यक्रमात कुटुंबासह शाहरुख खान.
शुक्रवारी रात्रीच्या कार्यक्रमात कुटुंबासह शाहरुख खान.

'स्पायडरमॅन' कलाकारांसोबत करिश्मा कपूर
करिश्मा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर इव्हेंटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती टॉम हॉलंड आणि झेंडायासोबत पोज देताना दिसत आहे. करिश्माच्या फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

नीता अंबानी, करिश्मा कपूर आणि स्पायडरमॅन फेम अभिनेत्री झेंडाया
नीता अंबानी, करिश्मा कपूर आणि स्पायडरमॅन फेम अभिनेत्री झेंडाया
करिश्माने झेंडायासोबत सेल्फी घेतला.
करिश्माने झेंडायासोबत सेल्फी घेतला.
टॉम हॉलंड आणि करिश्मा कपूर दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले.
टॉम हॉलंड आणि करिश्मा कपूर दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले.

पाहा पार्टीचे इतर काही खास फोटो....

सारा अली खान आणि क्रिती सेनन या दोघींनीही ब्लॅक आणि गोल्डन आउटफिट कॅरी केला.
सारा अली खान आणि क्रिती सेनन या दोघींनीही ब्लॅक आणि गोल्डन आउटफिट कॅरी केला.
श्रद्धा कपूरने ब्लॅक आणि ऑरेंज आउटफिट स्टाईल केले.
श्रद्धा कपूरने ब्लॅक आणि ऑरेंज आउटफिट स्टाईल केले.
कार्यक्रमापूर्वी तयार होताना आलिया भट्ट
कार्यक्रमापूर्वी तयार होताना आलिया भट्ट
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा एकमेकांना मिठी मारताना
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा एकमेकांना मिठी मारताना
स्टेज परफॉर्मन्स दरम्यान आलिया भट्ट आणि रश्मिका मंदाना
स्टेज परफॉर्मन्स दरम्यान आलिया भट्ट आणि रश्मिका मंदाना