आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'फुकरे 3'च्या कलाकारांमध्ये कोणताही बदल नाही:पुलकित सम्राटच्या अपोझिट रश्मिका मंदाना नव्हे विशाखा सिंह असेल लीड अ‍ॅक्ट्रेस, 30 ते 35 कोटी असेल चित्रपटाचे बजेट

अमित कर्ण16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'फुकरे 3'मध्ये नसणार रश्मिका, निर्माते कलाकारांमध्ये बदल करणार नाहीत

‘मिशन मजनू’ आणि ‘गुडबॉय’ सारख्या चित्रपटांत काम करणारी दक्षिणेतील अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या निर्मात्यांच्या पसंतीस उतरत आहे. तिला ‘फुकरे 3’मध्ये पुलकित सम्राटसोबत घेण्यात आल्याची चर्चा होती. याबाबत दिव्य मराठीने माहिती घेतली असता ती केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. दिव्य मराठीने चित्रपटाचे दिग्दर्शक मृगदीपसिंह लांबा यांच्यासोबत चर्चा केली असता ते म्हणाले, मला रश्मिकासोबत काम करायची इच्छा आहे. मात्र ती ‘फुकरे 3’मध्ये नाही. तिच्याशी याबाबत चर्चाही झालेली नाही. आम्ही हा चित्रपटही मागील दोन्ही चित्रपटांतील कलाकार पुलकित, विशाखा, पंकज, ऋचा, अली, मनजोतसोबतच सुरू करणार. आम्ही कलाकार बदलणार नाहीत.

  • अजून सुरू झाले नाही चित्रीकरण

चर्चा होती की, या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. याबाबत स्पष्टीकरण देत मृगदीप यांनी सांगितले, काही दिवसांपूर्वी वरुण शर्माच्या सोशल मीडिया हँडलवरून एक छायाचित्र व्हायरल झाले होते. यात ‘फुकरे 3’ लिहिलेले क्लॅप बोर्ड दिसत होते. बहुतेक यामुळेच लोकांनी अंदाज लावला असेल की, त्याच्या तिसऱ्या भागाचे चित्रीकरण सुरू झाले, मात्र तसे नाही. त्यावेळी आम्ही कार्यालयात पूजा ठेवली होती. याच पूजेत ‘फुकरे 3’चा क्लॅप बोर्डही ठेवला होता.

  • लाइव्ह लोकेशनवर करायचे आहे चित्रीकरण

निर्माते आधी या चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिल अखेर करणार होते. मात्र, आता कोरोना संचारबंदी लागू झाली आहे. जर सर्वकाही ठीक राहिले तर त्याचे चित्रीकरण मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचा बॅकड्रॉपही दिल्ली व मुंबईत असून निर्मात्यांना त्याचे चित्रीकरण लाइव्ह लोकेशनवर करायचे आहे.

  • 30 ते 35 कोटी असेल बजेट

चित्रपटाच्या आधीच्या भागाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. तरीही पुढील भागाचे बजेट 30 ते 35 कोटींच्या आतच असेल. निर्माते म्हणतात की, योग्य ठिकाणी खर्च केला तर 10 कोटींचा चित्रपटही 25 कोटींचा वाटतो. जसे केवळ सहा कोटींत तयार झालेला ‘तुंबाड’ही 25 ते 30 कोटींचा वाटतो. ‘फुकरे 3’बाबतही तसेच असेल. ‘फुकरे’चा पहिला भाग 16 कोटींत झाला होता. दुसरा भाग 22 कोटींचा होता. आता तिसऱ्याचे बजेट 30 ते 35 कोटी असेल.

बातम्या आणखी आहेत...