आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा13 डिसेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दोघींचा चाचणीचा अहवाल आल्यानंतर बीएमसीने अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या लोकांना स्वतःची चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात करण जोहर आणि रिया कपूरच्या घरी झालेल्या पार्ट्यांमध्ये या अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. करीना कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर ही पार्टी इतरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. कारण या पार्ट्यांमध्ये अनेक सेलिब्रिटी हजर होते आणि आता सर्वांची चाचणी केली जात आहे. चला जाणून घेऊया कोण आहेत ते सेलिब्रिटी-
आलिया भट्ट
अभिनेत्री आलिया भट्ट देखील करण जोहरच्या पार्टीत सामील झाली होती. तिला यावर्षी एप्रिलमध्ये कोविडची लागण झाली होती. सध्या आलिया आयसोलेट नाहीये. ज्या दिवशी करीनाचा रिपोर्ट आला त्या दिवशी ती आई सोनी राजदानसोबत मुंबईत स्पॉट झाली होती. गर्दीतही आलियाने मास्क घातला नव्हता.
करण जोहर
बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहरने 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त घरी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत चित्रपटात महत्त्वाची भूमिका वठवणारी करीना कपूर सहभागी झाली होती. करणसोबत त्याच्या घरी त्याची आई हीरु जोहर राहतात. याआधीही करणच्या घरातील अनेक हाउस हेल्प कोविड पॉझिटिव्ह आले होते.
अर्जुन कपूर- मलायका अरोरा
मलायका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरही करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत पोहोचला होता. मलायका यावर्षी सप्टेंबरमध्ये कोविड पॉझिटिव्ह झाली होती. मलायकानंतर अर्जुनचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. करणच्या पार्टीनंतर दोन दिवसांनी मलायका मुलगा अरहानला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली, जिथे तिच्यासोबत तिचा पुर्वाश्रमीचा नवरा अरबाज खानही उपस्थित होता. मलायका विमानतळावर कोविड प्रोटोकॉल फॉलो करताना दिसली होती.
करिश्मा कपूर
करीनाची बहीण करिश्मा देखील करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी करीना, करिश्मा आणि अमृता एकाच कारमधून तिथे पोहोचल्या होत्या. त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये बेबो आपला चेहरा लपवताना दिसत आहे. करिश्मा तिचे आई-वडील रणधीर कपूर आणि बबिता यांच्यासोबत राहते. कोविडमुळे रणधीर यांना यावर्षी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मसाबा गुप्ता
करीनाने 5 दिवसांपूर्वी रिया कपूरच्या घरी एका पार्टीला हजेरी लावली होती, जिथे डिझायनर मसाबा गुप्ताही पोहोचली होती. या पार्टीत करीनाने अमृतासोबत एन्ट्री घेतली होती. फोटोग्राफर विरल भयानी यांनी दोघींचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.
रिया कपूर
9 डिसेंबरला अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूरच्या घरी झालेल्या पार्टीत करीना कपूर आणि अमृता अरोरा सहभागी झाल्या होत्या. या पार्टीचे एक छायाचित्र देखील समोर आले आहे ज्यामध्ये सर्व पाहुणे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कशिवाय पोज देताना दिसत आहेत.
महीप कपूर
अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरही करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाली होती.
सीमा खान
सोहेल खानची पत्नी सीमा खान महीप कपूरसोबत पार्टीत आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.