आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज अपडेट:अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'साठी जूनपर्यंत तारखा नाहीत, साऊथ आणि हॉलिवूडच्या रिलीजमुळे सोलो रिलीजवर सस्पेंस

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मे ते जूनपर्यंत सोलो रिलीजसाठी तारखा नाहीत

अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' यावर्षी 18 मार्चला रिलीज होणार आहे. पण, त्याचा 'पृथ्वीराज' कधी येणार याविषयी ट्रेड कॉरिडॉरमध्ये चर्चा सुरु आहे. सध्या तरी 'पृथ्वीराज' हा चित्रपट 1 एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे मानले जात आहे. मात्र, प्रॉडक्शन हाऊसकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

अनेक ट्रेड अॅनालिस्टचे मत आहे की, यशराज रिलीजच्या बाबतीत खूप विचार करत आहे. त्यांच्याकडे 'पुष्पा' आणि 'स्पायडर मॅन'ची उदाहरणे आहेत. दोन्ही चित्रपट कोरोना काळात आले आणि तरीही सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट ठरले. अशा स्थितीत त्यांनीही 'पृथ्वीराज'साठी सेफ डेटसाठी जास्त वेळ थांबायला नको होते. त्यांनी हा चित्रपट रिलीज करायला हवा होता.

'पृथ्वीराज'च्या रिलीजसाठी जूनपर्यंत तारखा मिळणे कठीण
ट्रेड अॅनालिस्ट कोमल नाहटा यांच्या म्हणण्यानुसार, "अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' मार्चमध्ये येत आहे. सहसा एका अभिनेत्याच्या दोन चित्रपटांमध्ये 4 ते 6 आठवड्यांचे अंतर असावे. अशा परिस्थितीत तो 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होईल का हा प्रश्न आहे. त्यानंतर मे-जूनमध्ये हॉलिवूड आणि साऊथमध्ये अनेक मोठे रिलीज होणार आहेत. 'पृथ्वीराज' हा बिग बजेट चित्रपट असल्याने त्याच्या सोलो रिलीजसाठी जूनपर्यंतच्या तारखा मिळणे कठीण आहे. यावर्षी अक्षयचे 5 चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत अक्षयच्याच चित्रपटांशी टक्कर होऊ नये यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत.'

मे ते जूनपर्यंत सोलो रिलीजसाठी तारखा नाहीत
एग्झिबिटर विशेष चौहान आणखी एक महत्त्वाचा पैलू उघड करतात. ते म्हणाले, "दाक्षिणात्य चित्रपट हिंदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. येत्या काही महिन्यांत त्यांच्याकडे 'वलीमाई', 'खिलाडी', 'आचार्य', 'केजीएफ-2' यांसह आणखी अनेक मोठे साऊथ चित्रपट येत आहेत. 25 मार्चला 'RRR' येत आहे. रामचरण त्यात आहे. त्याची हाईप हिंदी पट्ट्यात कायम आहे. त्यानंतर त्याचा चिरंजीवीसोबतचा 'आचार्य' हा चित्रपट एका महिन्यानंतर 29 एप्रिलला येतोय. एप्रिल आणि मे महिन्यात अनेक हॉलिवूड चित्रपट आहेत. मे ते जून या कालावधीत 'पृथ्वीराज'च्या सोलो रिलीजसाठी तारीख नाही.'

एप्रिलमध्येही चित्रपट येणे कठीण होणार आहे.
'RRR'च्या ओपनिंगबद्दल बोलले जात आहे की त्याला 28 कोटींची ओपनिंग मिळणार आहे. अशा परिस्थितीत, 25 मार्चपासून ते एप्रिलच्या सुरुवातीच्या आठवड्यांपर्यंत तो चित्रपटगृहांमध्ये असेल. 'KGF-2' आणि 'लाल सिंग चड्ढा' पुढील आठवड्यात येतील. या दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. त्यामुळे एप्रिलमध्येही 'पृथ्वीराज' येणे कठीण होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...