आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅक्शन ड्रामा:कोण्याही वितरकाला नको  चिरंजीवीच्या ‘गॉडफादर’ चित्रपटाची खरेदी

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिरंजीवी लवकरच ‘गॉडफादर’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र, सध्याची परिस्थिती पाहता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाईल असे दिसते. याचे कारण चित्रपटाला अद्याप वितरक मिळालेले नाहीत.

हा चित्रपट रिलीज होण्यास अवघे ३ आठवडे उरले असून, कोणताही वितरक तो प्रदर्शित करण्यास तयार नाही.मेगास्टार आणि त्याच्या चित्रपटासाठी हे धोक्याचे चिन्ह आहे. दक्षिणेतील मेगास्टार चिरंजीवीच्या ४० वर्षांच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा त्याचा चित्रपट वितरक शोधण्यासाठी संघर्ष करत आहे.

ट्रेक टॉलीवूडच्या सर्वेक्षण अहवालावर विश्वास ठेवला तर, चित्रपटाला वितरक न मिळण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे चिरंजीवीचा मागील चित्रपट ‘आचार्य’ जो बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप झाला होता. या वर्षी २९ एप्रिल रोजी रिलीज झालेला हा चित्रपट १४० कोटी रुपयांच्या मेगा बजेटमध्ये बनला होता, तरीही त्याने केवळ ७४ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. या चित्रपटाचे निर्माते आणि वितरक दोघांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले.

बातम्या आणखी आहेत...