आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधील फिकी ईद:10 वर्षांत दुसर्‍यांदा फॅन्सला मिळाली नाही सलमानच्या चित्रपटाची भेट, घराबाहेरसुद्धा रौनक नाही

मुंबई (अमित कर्ण)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईदच्या सणाने सलमानच्या चित्रपटांना बळकटी दिली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

यावर्षी बॉलिवूडसाठी ईदची रौनक काहीशी फिकी पडली आहे. खासकरुन सलमान खानसाठी, कारण दहा वर्षांत दुस-यांदा त्याचा ईदच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला नाही. दरवर्षी ईदचा मुहूर्त सलमान खानच्या चित्रपटांसाठी लकी ठरला आहे. ईदवर त्याने जेव्हा जेव्हा आपला चित्रपट प्रदर्शित केला तेव्हा तो ब्लॉकबस्टर ठरल्याचे सिद्ध झाले आहे, परंतु यावेळी कोरोनामुळे ते होऊ शकले नाही.

  • कोविडचा प्रादुर्भाव नसता तर सलमानच्या चित्रपटाची चर्चा झाली असती

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिव्य मराठीसोबतच्या खास संभाषणात म्हटले, "कोविड नसते तर आम्ही या शुक्रवारी सलमानच्या चित्रपटाबद्दल बोललो असतो. उत्सवाच्या प्रसंगी मीडिया, व्यापारी विश्लेषक आणि चाहते सर्वजण खूप उत्साही असतात. सलमानचे चित्रपटांबद्दल सांगायचे म्हणजे 2009 मध्ये ईदला त्याचा 'वाँटेड' चित्रपट आला होता. तेव्हापासून दरवर्षी त्याचे चित्रपट ईदवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.'

आदर्श पुढे म्हणाले, "शाहरुखचा 'चेन्नई एक्सप्रेस' 2013 मध्ये ईदच्या निमित्ताने रिलीज झाला होता. माझ्या मते, 'वाँटेड' हा चित्रपट ईदला रिलीज करणे ही विचारपूर्वक केलेली रणनीती होती. आता तर परिस्थिती अशी आहे की पुढील दोन ते तीन वर्षांपर्यंत ईद, दिवाळी, ख्रिसमस, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या तारखा ठरवून बुक केल्या जातात. ईदच्या सणाने सलमानच्या चित्रपटांना बळकटी दिली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण सोबतच चित्रपट चालणार की नाही, हे त्यातील कंटेंटवर आधारित असते.' 

  • गेटी गॅलेक्सीमध्ये असते धूम

मुंबईतील वांद्रास्थित गेटी गॅलेक्सीमध्ये येथे दरवर्षी ईदवर धूम बघायला मिळते. येथील थिएटरची क्षमता एक हजारांहून अधिक सीट्सची असून ते सलमान खानच्या चाहत्यांनी हाऊसफूल असते. 

गेटीचे मालक मनोज देसाई यांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार, येथे ईदवर सलमानचा जो चित्रपट रिलीज होतो तो दोनदा बघावा लागतो. कारण पहिल्या दिवशी थिएटरच्या आता चाहत्यांचा एवढा आवाज असतो, की सलमानचे संवादही ऐकू येत नाहीत. त्याच्या एंट्रीवर चाहत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतो. मात्र  दुर्दैवाने यावर्षी लॉकडाऊनमुळे हे चित्र दिसणार नाहीये. 

  • ईदवर रिलीज झालेल्या सलमानच्या चित्रपटांचे वर्ल्डवाइड कलेक्शन
चित्रपटकलेक्शन 
वाँटेड93 कोटी
दबंग219 कोटी
बॉडीगार्ड234 कोटी
एक था टायगर308 कोटी
किक351 कोटी
सुल्तान577 कोटी
बजरंगी भाईजान603 कोटी
रेस 3305 कोटी
भारत308 कोटी

 

बातम्या आणखी आहेत...