आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा:सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली, 11 जूनला प्रदर्शित होणार 'न्याय : द जस्टिस'

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हायकोर्टाने स्थगिती देण्यास दिला नकार

दिल्ली हायकोर्टाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. या याचिकेत सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या मृत्यूवर आधारित चित्रपटावर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

हायकोर्टाने स्थगिती देण्यास दिला नकार
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर आधारित ‘न्यायः द जस्टिस’ या चित्रपटावर स्थिगिती आणण्याची मागणी सुशांतचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी केली होती. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

याचिकेत काय म्हणाले सुशांत सिंह राजपूतचे वडील

‘न्यायः द जस्टिस’ या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतच्या खासगी आयुष्यबद्दल खुलासा करण्यात आला असून यात त्याचे नाव, करिअर आणि अनेक गोष्टींमध्ये समानता आहे. यामुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम होवू शकतो असे सुशांतच्या वडिलांनी या याचिकेत म्हटले आहे. अनेक जण सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेत आहेत असा आरोप त्यांनी केला होता. सुशांतच्या आत्महत्येवरुन अनेक तर्क वितर्क लढवले जात असून अनेकजण वेगवेगळ्या कथा रचत आहेत. यामुळे त्याची आणि त्याच्या कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जात आहे, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता.

आता 11 जूनला प्रदर्शित होतोय चित्रपट
दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने दिग्दर्शक दिलीप आणि निर्मात्या सरला सराओगी यांना कोर्टाच्या सुनावणीपर्यंत चित्रपट रिलीज न करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा चित्रपट आता 11 जूनला प्रदर्शित होतोय.

14 जूनला सुशांतचा पहिला स्मृतीदिन
मागील वर्षी 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अद्यापही सीबीआय चौकशी सुरु आहे.

'न्याय : द जस्टिस' या चित्रपटात जुबैर खान मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय सुधा चंद्रन, असरानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत.

बातम्या आणखी आहेत...