आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नो टाइम फॉर हनीमून:लग्नाच्या दोन दिवसांनी शूटिंगसाठी लखनऊला रवाना झाली गौहर खान, एअरपोर्टवर सोडायला आला पती जैद आणि फ्लाइटमध्ये अचानक भेटला 'तो'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत झाली गौहरची भेट

अभिनेत्री गौहर खान 25 डिसेंबर रोजी कोरिओग्राफर जैद दरबारसोबत विवाहबद्ध झाली. लग्नाच्या दोन दिवसानंतरच गौहर मुंबई विमानतळावर दिसली. खरं तर लग्नानंतर गौहरने कामावर लक्ष केंद्रित केले आहे. निकाहच्या दोन दिवसानंतर ती लखनऊला चित्रीकरणासाठी रवाना झाली. यावेळी पती जैद तिला सोडायला विमानतळावर आला होता.

पुर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत झाली गौहरची भेट
फ्लाइटमध्ये गौहरसोबत एक विचित्र योगायोग जुळून आला. विमानातील प्रवासादरम्यान गौहरची तिच्या एक्स बॉयफ्रेंडशी अचानक भेट झाली. कुशल टंडन हे त्याचे नाव आहे. गौहर आणि कुशल बिग बॉसच्या सातव्या पर्वात एकत्र झळकले होते. त्यावेळी दोघांच्या अफेअरच्या ब-याच चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे हा शो संपल्यानंतर हे दोघे अनेकदा एकत्र दिसले. मात्र त्यांचे हे अफेअर फार काळ टिकले नाही.

कुशलचा फ्लाइटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तो गौहरसोबतच्या भेटीबद्दल सांगताना दिसतोय. 'मी माझ्या घरी जात होतो आणि अचानक माझ्या एका जुन्या मैत्रिणीची भेट झाली. तिचे नुकतेच लग्न झाले आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. ही मैत्रीण आहे गौहर खान. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. हाय किस्मत', असे कुशल या व्हिडिओत म्हणतोय.

गौहर आणि जैद यांनी लग्नात धरला होता ताल
लग्नानंतर गौहर खान ही प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांची सून झाली आहे. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गौहर आणि जैद यांचा निकाह झाला. जैद गौहर खानपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या लग्नात त्यांच्या कुटुंबीयांसह काही निवडक मित्र सहभागी झाले होते. गौतम रोडे, पंखुडी अवस्थी, हुसैन कुवाजेरवाला-टीना यांच्यासह दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नात गौहर आणि जैद यांनी एकत्र ताल धरला होता.

बातम्या आणखी आहेत...