आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा94 व्या ऑस्कर सोहळ्याच्या 2022 च्या इन मेमोरिअम विभागात जागतिक चित्रपट इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली ज्यांनी गेल्यावर्षी या जगाचा निरोप घेतला. यात सिडनी पॉटियर, बेट्टी व्हाइट, इव्हान रीटमॅन आणि स्टीफन सोंडहाइम यांच्यासह अनेकांच्या नावांचा समावेश होता. मात्र, या यादीत हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार आणि गायिका लता मंगेशकर यांच्या नावाचा समावेश नव्हता. ऑस्कर सोहळ्यात भारताच्या या दोन दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात न आल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
आदरांजली न दिल्याने चाहते नाराज
ऑस्करमध्ये लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांची आठवणही न केल्याने लोकांनी ऑस्करवर संताप व्यक्त केला आहे. एका चाहत्याने ट्विटरवर लिहिले, “जागतिक विक्रम करणाऱ्या लता मंगेशकर यांचे कोरोनामुळे निधन झाले, त्यांनी सर्व ऑस्करमध्ये एकत्रितपणे दाखवल्या गेलेल्या चित्रपटांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. तरीही, #Oscars2022 #Inmemoriam मध्ये त्यांचा उल्लेख ही केला नाही. कधीकधी, मला वाटते, वसाहतवाद (Colonialism) अजूनही आहे.”
एका चाहतीने लिहिले, "ऑस्कर इन ममोरियममध्ये लता मंगेशकर यांच्या नावाची अपेक्षा मी केली होती. पण...".
आणखी एकाने ट्विट केले, "#ऑस्कर 2022 #बॉलिवूडच्या प्रसिद्ध लता मंगेशकर - भारताच्या गानकोकिळा - यांचे गेल्या वर्षी निधन झालेल्या लोकांच्या यादीत देखील उल्लेख नाही."
36 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली
लता मंगेशकर यांचे यावर्षी 6 फेब्रुवारी रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 36 हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली. 2001 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'ए मेरे वतन के लोगो', 'बाबुल प्यारे' आणि 'लग जा गले'यासह अनेक गाणी त्यांनी गायली आहेत, जी आपण कधीही विसरू शकत नाहीत.
सर्वाधिक फिल्मफेअर जिंकण्याचा विक्रम
दिलीप कुमार यांचे गेल्या वर्षी 7 जुलै रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 'मुघल-ए-आझम' आणि 'देवदास' यांसारख्या क्लासिकमध्ये रोमँटिक व्यक्तिरेखा साकारल्या. पाच दशकांच्या त्यांच्या कारकिर्दीत 'नया दौर', 'राम और श्याम', 'क्रांती', 'कर्म' आणि 'सौदागर' यांसारख्या चित्रपटांचाही समावेश होता. सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम या अभिनेत्याच्या नावावर होता. त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी 8 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.